शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीत आज पोलिसांची ‘डॉल्बीपरीक्षा’

By admin | Updated: September 5, 2016 00:43 IST

नामवंत तालीम संस्थांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिला आहे.

कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलिस खात्याने कंबर कसली असली तरीही आज, सोमवारी श्री गणेशाच्या आगमनावेळी राजारामपुरीत डॉल्बी रोखण्याची खरी परीक्षा पोलिस खात्याला द्यावी लागणार आहे. राजारामपुरीत पोलिसांनी आज डॉल्बीला रोखले नाही, तर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत मात्र त्याचे पडसाद दिसून येणार आहेत. गणेशोत्सवात पोलिस खात्याने सार्वजनिक मंडळांना डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरातील अनेक नामवंत तालीम संस्थांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिला आहे. ‘नो डॉल्बी’साठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस खात्यामार्फत डॉल्बीविरोधी जनजागृती करण्याचे गेले महिनाभर प्रयत्न सुरू आहेत. डॉल्बीमुळे प्रतिवर्षी विसर्जन मिरवणूक रेंगाळते; तसेच डॉल्बीचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आहेत. तरीही कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीदिवशी अनेक मंडळे डॉल्बीच्या भिंती उभ्या करतात. या मिरवणुकीत राजारामपुरीतील गणेशोत्सव मंडळांना वेळेवर प्रवेश मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून राजारामपुरीतील सर्व मंडळे श्री गणरायाच्या आगमनावेळीच डॉल्बी व अत्याधुनिक विद्युतरोषणाई करून करोडो रुपयांचा चुराडा करतात. त्यामुळे श्री गणेशाच्या आगमनावेळीच राजारामपुरी जनता बझारपासून आगमनाच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मंडळे सहभागी होत असल्याने कासवाच्या पावलाने पुढे सरकत ही मिरवणूक प्रतिवर्षी विसर्जन मिरवणुकीला साजेशी अशीच ठरते. पण, या वर्षी पोलिस प्रशासनाने डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी जरी गणेशोत्सवात डॉल्बी लावणार नसल्याचे जाहीर केले असून, त्यांनी प्रत्यक्षात तसे कृतीत उतरविल्यास पोलिसांना यश मिळाले असे म्हणता येईल. त्यामुळे आज, सोमवारी राजारामपुरीत गणेशाच्या आगमनादिवशीच डॉल्बी रोखणे हेच खरे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)