शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बंगलोर दरोड्यातील ‘बिल्डर’ला पोलिसांचे अभय

By admin | Updated: November 28, 2014 00:35 IST

पोलिसांच्या हेतूबाबत शंका : सराफांमध्ये बिल्डरने केली मांडवली

एकनाथ पाटील - कोल्हापूर -बंगलोर दरोड्यात दरोडेखोर आणि सराफांमध्ये सोने-विक्री प्रकरणात मांडवली करणाऱ्या मंगळवार पेठेतील त्या ‘बिल्डर’ला बंगलोर आणि कोल्हापूर पोलिसांनी अभय देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात आहे. बिल्डरसह सराफावर गुन्हा दाखल न करता त्यांना क्लीन चिट देण्यामागे पोलिसांचा हेतू काय असावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात या दोघांकडून पोलिसांनी आपले हात ओले केल्याचे समजते. बंगलोरमध्ये सराफाचे चार किलो सोने लुटणारे संशयित दरोडेखोर सर्फराज खान, शलाल मकानदार, जावेद शेख, रमीज चाऊस हे चौघे जिवलग मित्र. सांगलीच्या दोघा मित्रांनी मदतीने बिस्किटे, चिप, विटेचा आकार असलेल्या चार किलो सोन्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यासाठी ते धडपडू लागले. नेहमी उठण्या-बसण्यात असणाऱ्या मंगळवार पेठेतील बिल्डर मित्राला त्यांनी हा प्रकार सांगितला. मांडवली करण्यासाठी जाता-जाता लाखो रुपये कमिशन मिळणार असल्याने त्याने आपल्या नेहमीच्या गुजरीतील एका सराफाला गाठले. बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीने सोने त्या सराफाने विकत घेतले. लुटलेल्या सोन्यामध्ये दरोडेखोरांना पैसे मिळाले. सराफाला निम्म्या भावात अस्सल २४ कॅरेटचे सोने मिळाले; तर बिल्डरला मांडवली करण्याचे कमिशन मिळाले. एका वेळी तिघांचा फायदा झाल्याने सर्वजण खूश होते. अखेर बंगलोरच्या पोलिसांना दरोडेखोरांचा कोल्हापुरापर्यंत धागेदोरे लागल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारी रेकॉर्डवर नसणाऱ्या नव्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवीत त्यांना चोरलेल्या सोन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी मंगळवार पेठेतील एका बिल्डरच्या सहकार्याने सराफाला सोने विकल्याचे सांगितले.पोलिसांनी त्या सराफाला गाठले. चोरीचे सोने विकत घेणे आणि मांडवली करणे हादेखील गुन्हाच आहे; त्यामुळे सराफासह बिल्डरच्या पायांखालील वाळू सरकली. बंगलोरचे पोलीस फक्त चौघा दरोडेखोरांना घेऊन गेले. त्या सराफ व बिल्डरवर मात्र कोणतीच कारवाई केली नाही. ...‘बिल्डर’ची पोलिसांशी मैत्री मंगळवार पेठेतील ‘त्या’ बिल्डरची जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील काही पोलिसांशी चांगलीच मैत्री आहे. आठ दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास काही पोलीस भवानी मंडपासमोर पोलीस व्हॅनजवळ बोलत थांबले होते. यावेळी बुलेटवरून रुबाबात तो बिल्डर पोलिसांजवळ आला. ‘काय साहेब, मी सांगितलेले काम लक्षात आहे नव्हे? बघू आता केव्हा करताय...’ असे म्हणून थोडा वेळ थांबून तो निघून गेला. त्यामुळे त्या बिल्डरची पोलिसांशी चांगलीच लगट असल्याचे दिसून येते.