शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:00 IST

जुन्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

इचलकरंजी : शहापूर येथील लोटस पार्क कमानी समोरील मोकळ्या मैदानात एका मित्राचा गावाकडील जुन्या वादातून मित्रानेच कोयत्याने वार करून खून केला. गणेश रमेश पाटील (२१) असे मृताचे नाव आहे. याबाबत अभिषेक सुकुमार मस्के याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मौजे आगर येथे एकाच परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी या दोघांमध्ये गावाकडील काही कारणावरून वाद झाला होता. तो वाद त्यावेळी मिटविला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी अभिषेक यांने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेश याच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर सपासप वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहून अभिषेक तेथून पळून गेला.

या  घटनेनंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. काही वेळातच गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती समजताच आराग परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी व इंदिरा गांधी रुग्णालयात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस