शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील चित्री, आंबेओहोळ, खानापूर धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST

आजरा : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने चित्री, आंबेओहोळ व खानापूर ही धरणे आज तुडुंब भरली. दोन दिवसांत चित्री धरणात ...

आजरा : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने चित्री, आंबेओहोळ व खानापूर ही धरणे आज तुडुंब भरली. दोन दिवसांत चित्री धरणात चाळीस टक्के इतका उच्चांकी पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने हिरण्यकेशी व चित्री नदींना महापूर आला आहे. रात्री उशिरा हिरण्यकेशी काठावर असलेल्या रामतीर्थवरील राम मंदिरात पाणी घुसले. दुपारी कमी झालेला पाऊस सायंकाळी पुन्हा कोसळण्यास सुरुवात झाली आहे.

चित्री धरणाच्या सांडव्यातून १२०८, तर विद्युतगृहातून १८० असे १३८८ क्युसेकने, तर एरंडोळ व धनगरवाडी ही धरणे यापूर्वीच भरली असून त्यामधून ३५० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजरा गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री प्रकल्प भरल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. काल व आज पडलेल्या पावसाने नदी व ओढ्या काठच्या जमिनीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काल रात्रीपासून रामतीर्थवरील राम मंदिरात तीन फूट पाणी आहे. हिरण्यकेशी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तालुक्यातील चित्रीसह अन्य धरणाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी एम. एल. मळगेकर यांनी दिली.

पहिल्याच वर्षी आंबेओहोळ धरण तुडुंब

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्याप संपलेला नसताना घळभरणी झालेले आंबेओहोळ धरण तुडुंब झाले. सांडव्यातून ७५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पहिल्याच वर्षी अगदी महिनाभरातच हा प्रकल्प तुडुंब झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

फोटो कॅप्शन - चित्री धरण तुडुंब भरल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी.