शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सातशे कर्मचाऱ्यांना निवृत्तीदिवशीच पीएफ

By admin | Updated: November 4, 2016 00:38 IST

विशेष कक्षाची स्थापना : प्रत्येक महिन्याची पाच जिल्ह्यांतील स्थिती

 कोल्हापूर : खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काच्या भविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) यापूर्वी खोळंबून राहावे लागत होते. आता मात्र त्यांना निवृत्तीदिवशीच किंवा त्याआधीच हा निधी देण्याचा निर्णय ‘एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन’ने घेतला आहे. ‘पीएफ’च्या कोल्हापुरातील कर्मचारी-सदस्यांसाठी ही शुभवार्ताच आहे. त्यामुळे पाच जिल्ह्यांच्या परिक्षेत्रातील या अंतर्गत येणाऱ्या सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा महिन्याकाठी लाभ होणार आहे. कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत ७००० आस्थापना आहेत. त्यांमध्ये सुमारे साडेसात लाख कर्मचारी सदस्य कार्यरत आहेत. २० पेक्षा जास्त कर्मचारी व त्याहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या आस्थापनांना कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडणे सक्तीचे आहे. या आस्थापनांतून दर महिन्याला किमान सातशे कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यामुळे या ‘पीएफ’च्या निर्णयाचा लाभ या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय स्तरावर ‘ईपीएफ’च्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता सर्व क्षेत्रीय कार्यालयांत त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. निर्णय जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होऊन तत्काळ निधी हाती पडणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी अपुऱ्या कागदपत्रांमुळे व काही त्रुटींमुळे महिनोन्महिने कर्मचाऱ्यांना हा निधी मिळत नव्हता. कागदपत्रे पूर्ण नसल्यास दावे परत जातात. याकरिता कागदपत्रे पूर्ण नसल्यास त्या आस्थापनेला व सदस्यांना स्मरणपत्रे पाठविली जातात. या निर्णयामुळे जे आता काही महिन्यांतच निवृत्त होणार आहेत व जे निवृत्त झाले आहेत; मात्र त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही, अशा सदस्यांसाठी ही शुभवार्ताच असल्याने स्वागत होत आहे. ‘पीएफ’साठी हवीत ही कागदपत्रे मुलांचे जन्मदाखले सदस्य मृत असेल तर त्याचा दाखला व हयात असेल तर जन्मदाखला पत्नी व सदस्यांचे प्रत्येकी तीन पासपोर्ट फोटो मुलांचे स्वतंत्र तीन फोटो मुले २५ वर्षांच्या आतील असतील तर बँकांची पासबुक झेरॉक्स सदस्यांच्या पश्चात लिस्ट आॅफ सर्व्हायव्हिंग मेंबर (एलएसएम सर्टिफिकेट) अर्ज भरून देणे आवश्यक आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक जन्म व मृत्यू नोंदणीच्या सत्य प्रती कर्मचारी ज्या आस्थापनेत सेवा बजावत असेल, त्या आस्थापनेच्या मालक, जबाबदार अधिकारी किंवा संचालकांकडून सर्व कागदपत्रे साक्षांकित करून देणे बंधनकारक स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक या पाचपैकी एका बॅँकेत खाते असणे आवश्यक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २० पेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या सुमारे ७००० आस्थापना कार्यरत आहेत. पाच जिल्ह्यांत एकूण ७,५०,००० कर्मचारी सदस्यांची नोंदणी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शुभवार्ताच म्हणावी लागेल