शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पैसे, दागिने नव्हे तर चक्क महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; खुद्द न्यायाधीशांनीच पकडले रंगेहाथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 2:21 PM

यातून अनेक शंका कुशंका निर्माण होऊन गल्लीत शेजाऱ्यांशी वाद होत होते. पण त्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.

गारगोटी :  गारगोटी येथे गेल्या दिड वर्षांपासून दारात वाळत टाकलेली कपडे चोरीला जात होतीत. मध्यरात्रीच्या वेळी हा विकृत मनोवृत्तीचा चोरटा अनेकांच्या घराच्या बाहेरील कपडे चोरत होता. न्यायालय परिसरात सोमवारी पहाटे चोरी करत असताना खुद्द न्यायाधीशांच्या सतर्कतेमुळे त्याला पाळत ठेऊन रंगेहाथ पकडले.सुशांत सदाशिव चव्हाण (वय ३५ ,रा.सोळांकूर ,ता राधानगरी ,जि. कोल्हापूर सध्या रा.सोनाळी-गारगोटी) असे या चोरट्याचे नाव आहे. भुदरगड पोलिसांत त्याच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्याने साडे पाच हजाराची कपडे चोरून नेली आहेत.गेल्या दिड वर्षांपासून गारगोटी येथील अनेकांच्या घराबाहेर वाळत घातलेली कपडे विशेषतः महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जात होती. अनेकांनी कुत्र्याने दूर नेऊन टाकली असतील, शेजाऱ्यांचेच हे काम असावे. यातून अनेक शंका कुशंका निर्माण होऊन गल्लीत शेजाऱ्यांशी वाद होत होते. पण चोरी किरकोळ व कपड्यांची असल्यामुळे त्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. या संधीचा फायदा घेऊन हा चोरटा मात्र ही कपडे चोरून ती दूर नेऊन टाकत होता. न्यायालय परिसरात डिसेंबर महिन्यात तीन आणि एकवीस तारखेला तर जानेवारी महिन्यात आठ तारखेला कपडे चोरीला गेलीत. या घटना वारंवार घडू लागल्यामुळे न्यायालय कर्मचारी व खुद्द न्यायाधीशांनीच परिसरात खास सी सी टीव्ही कॅमेरे लावले.त्यातून चोरटा समजून आला.पण त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी खुद्द न्यायाधीशांनीच त्याच्यावर पाळत ठेवली.आज सोमवारी (दि १७)रोजी पहाटे पाचच्या सुमारास संरक्षक भिंतीवरून उडी मारून चोरटा पुन्हा न्यायालय परिसरात चोरी करण्यासाठी आला असता  खुद्द न्यायाधीश यांच्या सतर्कतेमुळे न्यायालय कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या हवाली केले. याबाबतची फिर्याद गारगोटी न्यायालय कर्मचारी रंगराव हरी चांदम(रा राधानगरी) यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. या चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चोरटा एका खासगी दवाखान्यात नोकरीसहा चोरटा गारगोटी येथील स्टँड परिसरातील एका प्रसिद्ध खासगी दवाखान्यात नोकरीस आहे, कमी दरात हा घरी सुध्दा रुग्णांवर उपचार करतो असे समजते, परंतु अफलातून चोरी तीही फक्त कपड्यांची करणाऱ्या कपडेचोर मनोरुग्ण चोरट्याची आज गारगोटीत दिवसभर खुमासदार चर्चा सुरू होती.

सुरक्षा रामभरोसेगारगोटी येथील दिवाणी न्यायालयाचे आवारात न्यायालय, व न्यायाधीश निवासस्थान आहे, या भोवती संरक्षक भिंत आहे, पण ती कांही ठिकाणी ढासळली आहे, त्यामुळे न्यायालयाची सुरक्षाच रामभरोसे झाली आहे. त्याचाच फायदा घेऊन चोरटे आत शिरतात, त्यामुळेच अशा चोरीच्या घटना घडत असून न्यायालय परिसराची संरक्षक भिंत बांधून त्याची उंची वाढवण्याची आवश्यकता असलेची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस