Join us  

'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 12:52 PM

Lok Sabha Election : काल बारामतीमध्ये शेवटची सभा झाली. या सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.

Lok Sabha Election ( Marathi News ) : काल बारामतीमध्ये प्रचारसांगता सभा झाली. या सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरही थकवा जाणवत होता. यानंतर शरद पवार यांनी पुढील नियोजित दौरे रद्द केले. त्यांची आज बीड येथे नियोजित सभा होती. या सभेलाही खासदार पवार उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी एक भावुक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

काल बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेवेळीच खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. त्यांचा आवाज बसलेला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. या सभेत शरद पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केले आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पवारांसाठी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. 

बजरंग सोनवणे यांची फेसबुक पोस्ट काय?

साहेब, तब्येतीला जपा!

तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..

तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

~ तुमचा, बजरंग बप्पा!

टॅग्स :बजरंग सोनवणेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४