शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरवासियांनो सावधान! पुन्हा वाढतोय कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

जयसिंगपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर उपाययोजना राबविल्या जात ...

जयसिंगपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. जयसिंगपूर शहरात आठवड्याभरात कोरोनाचे १६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, शुक्रवारी रंगपंचमीनिमित्ताने कोरोनाचे नियम तोडून तरुणवर्ग बिनधास्तपणे शहरात वावरत होता. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेत वाढ करणारी ठरत आहे. गतवर्षी मे महिन्यात कोरोनाचे १२ रुग्ण सापडले होते. यावर्षी गेल्या आठ दिवसात जयसिंगपूर शहरात तब्बल वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन अंकी झालेली ही संख्या तीन अंकी होण्याअगोदरच वाढत्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनतेच्याही सहकार्याची अपेक्षा आहे. शहरातील कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव होईल, या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर शिवाय सॅनिटायझरचा वापर करुन नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क नाही, वस्तू नाही याची अंमलबजावणी व्यावसायिकांनी करावी शिवाय भाजी, फळ विक्रेत्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे करावे लागणार आहे. भाजी व फळ विक्रेत्यांच्या अ‍ॅन्टिजेन तपासणीचा विषय पुढे आला होता. त्याबाबतही पालिकेने नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु आहे. ४५हून अधिक वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. याठिकाणी पालिका व आरोग्य प्रशासनाने नियोजन करुन लसीकरणाला गती देण्याची गरज आहे.