शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-शाळा बंदचा निर्णय तरिही विद्यार्थी शाळेत, शिक्षकांच्या सुचनेनंतर गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:12 IST

परदेशातून आलेल्यांनी ‘सीपीआर’ येथील कक्षात वैद्यकीय तपासणी करून १४ दिवस घरातच थांबावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

ठळक मुद्देपरदेशातून आलेल्यांनी वैद्यकीय तपासणी करून घरातच थांबावेशाळा बंदचा निर्णय तरिही विद्यार्थी शाळेत, शिक्षकांच्या सुचनेनंतर गेले परत

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सोमवारपासून बंद होत्या. शाळा बंद असा आदेश आहे, तरिही आज अनेक विद्यार्थी शाळेत आले. त्यांना पुढिल तारखेपर्यंत शाळा बंद राहणार असे सांगण्यात आले. त्यानंतर ते विद्यार्थी परत गेले.

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी  दिली. परदेशातून आलेल्यांनी ‘सीपीआर’ येथील कक्षात वैद्यकीय तपासणी करून १४ दिवस घरातच थांबावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोरोना’संदर्भात पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आदी उपस्थित होते. 

आंबोली, बेळगाव यासारख्या सीमेवरील भागातून परदेशातून आलेले जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोक येऊ शकतात. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.ते पुढे म्हणाले, परदेशातून येणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वत:हूून प्रशासनाला माहिती द्यावी. त्याचबरोबर स्वत:चे स्क्रीनिंग (वैद्यकीय तपासणी) करून घ्यावी. आपली माहिती लपवू नये. कारण त्यामुळे सर्वप्रथम स्वत:च्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी स्वत:च घरी १४ दिवस विलगीकरण व्हावे.

पाच खासगी रुग्णालयांत स्क्रीनिंगची सुविधा‘सीपीआर’सह इतर पाच खासगी रुग्णालयातही ‘कोरोनासदृश रुग्ण तपासणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अथायू हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या ठिकाणीही परदेशाहून आलेल्यांचे स्क्रीनिंग (वैद्यकीय तपासणी) होणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आतापर्यंत ११८ जणांची तपासणीआतापर्यंत ११८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये परदेशातून ११४ जणांसह इतर ठिकाणाहून आलेल्या ४ जणांचा समावेश आहे. विलगीकरण कक्षात ३ जण दाखल असून ६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह व दोन रिजेक्ट करण्यात आले आहेत. सध्या कोणताही धोका नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाSchoolशाळाkolhapurकोल्हापूर