दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:17+5:302021-02-05T06:55:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर आंबेवाडी (ता. करवीर) येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी झाला. दिलीप ...

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर आंबेवाडी (ता. करवीर) येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी झाला. दिलीप बापू जाधव (वय ५३, रा. आंबेवाडी) असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
अपघातात एक जखमी
कोल्हापूर : हालोंडी रोडवर सांगली फाटा येथे रस्ते अपघातात एक जण गंभीर जखमी झाले. गोवर्धन वाघमारे (वय ४०, रा. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. त्यांना बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
भुईबावडा घाटात अपघात, एक जखमी
कोल्हापूर : भुईबावडा घाटात रस्ते अपघातात मंगळवारी रात्री रामचंद्र आनंदा पाटील (वय ४०, रा. खेरवडे, ता. गगनबावडा) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.