शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सेनापती कापशी आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड

By admin | Updated: May 13, 2015 00:47 IST

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात : वैद्यकीय अधिकारी गैरहजर; सुविधांचा अभाव

सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथील रुग्णांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या आरोग्य केंद्रातील कारभाराबाबत ग्रामस्थांत प्रचंड असंतोष आहे. वेळोवेळी तक्रार व आंदोलने करूनही या विभागातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.चिकोत्रा खोऱ्यातील २१ ते २२ गावांसाठी हे आरोग्य केंद्र आहे. दोन वर्षांपूर्वी येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते, परंतु दोन वर्षांपासून कर्मचारी आहेत, तर डॉक्टर नाहीत, डॉक्टर आहेत तर कर्मचारी नाहीत, अशी येथील अवस्था आहे. त्यामुळे रुग्णांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी येथील रुग्णांच्या संस्थेत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.चिकोत्रा खोऱ्यातील सुमारे ४० हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या कापशी आरोग्य केंद्रात आठ-आठ दिवस डॉक्टरही हजर नसतात. यावरून या विभागाला याचे किती गांभीर्य आहे याची कल्पना येते. दोन वर्षांपूर्वीच्या पावसात उडून गेलेले पत्रे आजतागायत बसविले नसल्यामुळे अवकाळी पावसामुळे संपूर्ण आरोग्य केंद्रात पाण्याचे तळे साचते. त्यातच कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली जाते.या आरोग्य केंद्रात मूलभूत औषध पुरवठा असूनही त्याचा लाभ सामान्य माणसाला मिळत नाही. उलट रुग्णांना बाहेरील औषधे आणावयास सांगितले जाते. रेबीज व साप चावलेल्या लसीचे इंजेक्शन या आरोग्यकेंद्रात कधीच मिळत नाही. परिणामी अशा व्यक्तींना गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला दाखल करावे लागते. या दरम्यान अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याचे कोणतेच सोयरसुतक या आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना नाही.शवविच्छेदन विभागही आता अखेरची घटका मोजत आहे. परिणामी शवविच्छेदन करण्याकरिता मुरगूड अथवा गडहिंग्लजला मृतदेह घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. एकूणच या आरोग्य केंद्राच्या एकूण कारभाराबाबत लोकांच्यात संतप्त प्रतिक्रिया आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)