शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लॅबोरेटरीजकडून रुग्णांचे ‘रक्त शोषण’

By admin | Updated: December 17, 2015 01:18 IST

आर्थिक पिळवणूक : कोल्हापूर जनशक्तीचा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी निर्माण झालेल्या कोल्हापुरातील काही लॅबोरेटरीजमध्ये रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक सुरू आहे. खासगी रुग्णालयांसाठी तर हा जोडधंदाच झाला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जनशक्तीतर्फे पत्रकाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.गुंतागुंतीच्या आजारांचे निदान करताकरता आता सर्दी-तापासाठीसुद्धा रुग्णांना या लॅबचा रस्ता दाखविला जात आहे. यामधून रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. शहरात रक्त, लघवी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., यासारख्या तपासण्या करणाऱ्या लॅबची संख्या सध्या वाढत आहे. या सर्वच लॅबचे दर वेगवेगळे असून, कोठेही याचे दरपत्रक लावलेले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फक्त एम.डी. पॅथॉलॉजिस्टनाच अशा लॅब चालविण्याचा अधिकार असताना ठिकठिकाणी या लॅबचे पेव फुटले आहेत. कोल्हापुरात साधारणपणे ३५ ते ४० एम.डी. पॅथॉलॉजिस्ट असताना लॅबची संख्या मात्र शेकडोंमध्ये आहे. यावरती शासन म्हणून कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रत्येक लॅबने मनमानी दर आकारून रुग्णांची पिळवणूक चालविली आहे. काही खासगी रुग्णालयांचे तर विशिष्ट लॅबशी साटेलोटे आहेत. या रुग्णालयांमधून रुग्णांना ठराविक लॅबमधूनच रक्त व इतर घटक तपासणीचा आग्रह धरला जातो. तसेच एखाद्या लॅबने नुकतीच केलेली तपासणी अवैध ठरवत पुन्हा नव्याने आपल्याच लॅबमधून तपासणी करण्याचा आग्रह धरला जातो. यामध्ये खासगी रुग्णालयांचे ‘कट प्रॅक्टिस’ असल्याचा दाट संशय आहे. काही लॅबचे सरकारी रुग्णालयांशीही साटेलोटे असून, या ठिकाणीही त्यांनी आपले एजंट नेमले आहेत.एकंदरीत या सर्व प्रकाराकडे आरोग्य खाते पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचा संघटनेचा स्पष्ट आरोप आहे. या सर्व लॅबोरेटरीजवर नेमके नियंत्रण कोणाचे? दर निश्चितीची पद्धत काय? खासगी रुग्णालयांकडून विशिष्ट लॅबसाठी आग्रह का? एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व्यतिरिक्त इतर व्यक्तींना या लॅब चालविण्याचा अधिकार आहे का? या सर्व गोष्टींचा खुलासा आरोग्य विभागाने जनतेसमोर करावा. तसेच लवकरच नागरिकांच्या तक्रारी घेऊन व्यापक शिष्टमंडळ जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यावर सरचिटणीस समीर नदाफ यांची सही आहे. (प्रतिनिधी)