शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्जिन’मध्ये गुंतलाय पॅथॉलॉजी व्यवसाय

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

संगनमताने रुग्णांची लूट : रुग्ण पाठविण्याच्या अटीवर बड्या हॉस्पिटलना फायनान्स

राजाराम लोंढे - कोल्हापूर शहरातील ठरावीक पॅथॉलॉजी मालकांनी जास्तीत जास्त रुग्ण आपल्याकडे पाठविण्याच्या अटीवर शहरातील बड्या हॉस्पिटलना फायनान्स पुरविण्याचा धडाकाच लावला आहे. कलेक्शन बॉय व डॉक्टरांची तर साखळीच तयार झाली असून, संगनमताने रुग्णांना लुटण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. पॅथॉलॉजीमध्ये घुसलेल्या खासगी सावकारीने सामान्य रुग्णांचा जीव मात्र गुदमरला आहे. शहरात साधारणत: २० पॅथॉलॉजी कार्यरत आहेत. येथे रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. रुग्णांचे निदान योग्य होण्यासाठी अलीकडे सर्वच डॉक्टर ताप भरला तरी रक्त, लघवी तपासण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला या तपासणीचे दर माफक होते; पण अलीकडे या व्यवसायाचे पुरते बाजारीकरण झाले आहे. याला केवळ पॅथॉलॉजीचे मालक जबाबदार नाही तर डॉक्टरही तितकेच जबाबदार आहेत. अनेक डॉक्टरांकडे गरज नसताना रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करावयास लावतात. या तपासण्या केल्या की त्यातील टक्केवारी डॉक्टरांना मिळते. तपासणीचे बिल मोठे असले तरी १५ टक्के व कमी असेल तर २० टक्के कटिंग डॉक्टरांचे असते. पण काही पॅथॉलॉजीमध्ये तब्बल ८० टक्क्यांपर्यंत कटिंग लावून रुग्णांना लुबाडण्याचा उद्योग सुरू आहे. शहरातील नेहमी गजबजलेल्या पॅथॉलॉजी सेंटरमध्ये दिवसाला ५०० ते ६०० सॅम्पल येतात, एवढ्यांची तपासणी होते केव्हा, संबंधित जबाबदार डॉक्टरांना एवढ्या वेळेत सह्णा करणेही अशक्य आहेत तरीही सकाळचा सॅम्पलचा रिपोर्ट दुपारी संबंधित दवाखान्यांत पोहोच केला जातो. काही ठिकाणी तर कलेक्शन बॉय स्वत:च रिपोर्ट तयार करून संबंधित डॉक्टरांची स्वाक्षरी मारण्याचा प्रताप करतात. सर्वच पॅथॉलॉजी व हॉस्पिटलमध्ये असे प्रकार होत नाहीत. दोन-तीन पॅथॉलॉजी सेंटरनी सारा जिल्हा अक्षरश: पोखरला आहे. या व्यवसायावर कोणाचेच नियंत्रण नाही. दिवसेंदिवस या व्यवसायातील मार्जिन वाढू लागल्याने रुग्णांची दमछाक होत आहे. ब्लड बॅँकांप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण पॅथॉलॉजीवर गरजेचे आहे. शासनाचा अंकुश राहिला तरच रुग्णांची मान या दलालांच्या तावडीतून सुटणार आहे. सॅम्पल टेबलवरच; तोपर्यंत रिपोर्ट हातातगेल्या आठवड्यात कोकणातील डॉक्टर आपल्या वडिलांना घेऊन कोल्हापुरातील ऐतिहासिक चौकातील एका हॉस्पिटलमध्ये आले होते. रुग्णाच्या रक्ताच्या विविध चाचण्या करावयाच्या असल्याने तिथे कलेक्शन बॉय आला. डॉक्टरांनी (रुग्णांचे नातेवाईक) रक्ताची सॅम्पल टेबलावर ठेवली आणि डॉक्टर वडिलांना भेटायला गेले. भेटून येईपर्यंत रिपोर्ट हातात देऊन पैशांची मागणी केल्यानंतर डॉक्टरही अचंबित झाले. सॅम्पल टेबलवर असताना रिपोर्ट आला कोणाचा? असा जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर हॉस्पिटलच्या यंत्रणेची बोबडी वळली. डॉक्टरांचा सांकेतिक कोडएखाद्या रुग्णांच्या पाचपैकी दोन टेस्ट करणे गरजेचे असते; पण पाच लिहून द्यायच्या आणि करायच्या मात्र दोनच. यासाठी डॉक्टर आपल्या चिठ्ठीवर विशिष्ट प्रकारची खूण करतात, अशा पद्धतीनेही रुग्णांना लुटले जात आहे. टक्केवारी सगळीकडे; पण कोल्हापुरात अतिरेकडॉक्टर व पॅथॉलॉजी यांच्यामधील टक्केवारीचे नाते सगळीकडे आहे; पण येथे डॉक्टर आणि पॅथॉलॉजीचे मालक रुग्णांच्या मानेवर सत्तूरच ठेवतात. या अतिरेकामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. काही पॅथॉलॉजी सेंटरचा चांगला कारभारशहरातील काही पॅथॉलॉजींचा चांगला कारभार आहे; पण काही डॉक्टर ठरावीक पॅथॉलॉजीसाठी आग्रही असल्यामुळे यामागचे टक्केवारीचे गणित लपून राहिलेले नाही.