शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गेली दोन वर्षे नगरपरिषदा, नगरपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबितच

By admin | Updated: March 9, 2015 01:13 IST

शासनाचा कारभार : तालुकास्तरावरील नगरपंचायतींसाठी हरकती

प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील हुपरी ग्रामपंचायतीची नगरपरिषदेसंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया वगळता जिल्ह्यातील दोन वर्षांपूर्वी नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच तालुकास्तरावरील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्यासंदर्भातील शासनाने मागविलेल्या हरकती याला अपवाद आहेत. नगरविकास खात्याकडून २५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यासाठी जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या विभागाने अशा गावांची यादी व आवश्यक माहिती डिसेंबर २०१२ मध्ये सहायक संचालक, नगररचना विभागाला पाठविली होती. त्यावर नगररचना विभागाने आपला अभिप्राय नोंदवून फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल पाठविला होता. त्यानुसार या अहवालाबाबत शहानिशा करून, आपले मत नोंदवून १९ मे २०१३ रोजी नगरपालिका विभागाने शासनाला सहा नगरपरिषदा व १५ नगरपंचायती व्हायला हरकत नाहीत, असा अहवाल पाठविला होता. यामध्ये कोडोली, शिरोळ, कबनूर, हुपरी, शिरोली (पुलाची) व हातकणंगले यांची नावे नगरपरिषद होण्यासाठी, तर करवीर तालुक्यातील वडणगे, मुडशिंगी, हातकणंगले तालुक्यातील पारगाव, भादोले, आळते, हेर्ले, पट्टणकोडोली, रुकडी, कुंभोज; भुदरगड तालुक्यातील गारगोटी, आजरा तालुक्यातील आजरा; शिरोळ तालुक्यातील नांदणी, उदगाव, दानोळी, अब्दुललाट यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्यासाठी नुकतीच ्घोषणा जारी केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत ६ मार्चपर्यंत हरकती घेण्यात आल्या. प्रलंबित नगरपरिषदा ४शिरोली पुलाची, हुपरी, हातकणंगले, तारदाळ व कोरोची यांची संयुक्तनगर परिषद, कोडोली, शिरोळ प्रलंबित नगरपंचायती ४वडणगे, मुडशिंगी , पारगाव, भादोले, आळते, हेर्ले, पट्टणकोडोली, रुकडी, कुंभोज, गारगोटी , आजरा, नांदणी, उदगाव, दानोळी, अब्दुललाट