शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

परळी बंदला प्रतिसाद

By admin | Updated: September 4, 2015 00:24 IST

परळी : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीचे आवरण काढून भाविकांना स्पर्श दर्शन खुले करावे,

कोल्हापूर : येथील स. म. लोहिया हायस्कूल - कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या प्राची पंडित कांबळे (वय १७, रा. २८८३, बी वॉर्ड, यल्लम्मा मंदिरजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर) हिचा कनिष्ठ महाविद्यालयात तिच्या वर्गातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडली. गुरुवारी सकाळी ७:२० वाजता प्राचीला नेहमीप्रमाणे वडील पंडित कांबळे यांनी स. म. लोहिया महाविद्यालयात सोडले. त्यानंतर ती पहिले लेक्चर सुरू होणार असल्याने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या वर्गात गेली. वर्गात गेल्यावर काही वेळातच तिला चक्कर आल्यासारखे व अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिच्या सहकारी विद्यार्थिनींनी तिला तातडीने खाली आणले. यावेळी एकच धावपळ उडाली. शिक्षकही त्याठिकाणी आले. त्यांनी प्रथम तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले. तो बंद असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला राजारामपुरी येथील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेले, परंतु तेथे नेऊनही तिचे प्राण वाचले नाहीत. उपचारापूर्वीच तिला मृत्यूने गाठले होते. तिच्या आकस्मिक जाण्याने आई, वडील आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. वडील तर निस्तब्ध झाले होते. वडील पंडित कांबळे हे विक्रीकर विभागात नोकरीस आहेत. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली आहे. ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’प्राची ही हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. मनमिळावू स्वभावामुळे तिने सर्वांना आपलेसे करून घेतले होते. दहावीत चांगले गुण मिळाल्याने विज्ञान शाखेतून करिअर करायचे असे तिने ठरविले होते. बारावीत प्रवेश घेतल्यापासूनच सुरुवातीपासूनच तिने मेडिकल सीईटीचा अभ्यास सुरू केला होता. मात्र, करिअर करण्यापूर्वीच काळाने तिला हिरावून नेले. तिच्या अचानक जाण्याने स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थिनी वर्गाला धक्का बसला. प्राचीने आपल्या वडिलांकडे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा काही वर्षांपूर्वी बोलून दाखविली होती. त्याप्रमाणे कांबळे कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान केले. त्यामुळे ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ असा आदर्श प्राचीने घालून दिल्याची चर्चा येथे होती.