शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे व्याख्यानमाला १ डिसेंबरपासून

By admin | Updated: November 23, 2015 00:05 IST

द्वादशीवार, पी. साईनाथ, तिस्ता सेटलवाड यांची व्याख्याने

कोल्हापूर : येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमाला यंदा १ ते ७ डिसेंबरदरम्यान होत आहे. ‘लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान’ हा यंदाच्या व्याख्यानमालेचा मुख्य विषय आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात ही व्याख्यानमाला रोज सायंकाळी सहा वाजता होईल. राज्य व देशपातळीवरील नामवंत वक्त्यांचे विचारमंथन ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. यंदा ‘लोकमत,’ नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, आदींची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. प्रतिवर्षी या व्याख्यानमालेस वाढता प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर यंदा होत असलेल्या या व्याख्यानांना विशेष महत्त्व असल्याची माहिती संयोजक संस्था असलेल्या श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी शुक्रवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक प्रतिष्ठान १९९४ पासून समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. शाहीर जागर, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, कविसंमेलन, पथनाट्य, नवलेखक शिबिर, आदी उपक्रमही प्रतिष्ठानने घेतले आहेत. अवी पानसरे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला दरवर्र्षी होते. मंगळवारी (ता. १) : वक्ते : ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार : विषय - सेक्युलर. अध्यक्ष - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो. बुधवारी (ता. २) : राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही अध्यक्ष : डॉ. जयसिंगराव पवारगुरुवारी (ता. ३) : तरुण पत्रकार समर खडस : ‘दहशतवाद आणि धर्मांधता.’ अध्यक्ष : दिलीप पवारशुक्रवार (ता. ४) ‘विवेकवाद’ विषयावर ज्येष्ठ विचारवंत पी. साईनाथ. अध्यक्ष : उदय नारकर.शनिवारी (ता. ५) धर्मांधता, अल्पसंख्याक, स्त्रिया’ विषयावर विचारवंत तिस्ता सेटलवाड. अध्यक्ष : प्रा. आशा कुकडेरविवारी (ता. ६) प्रा. जयदेव डोळे : ‘धर्मांधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.’ अध्यक्ष : डॉ. जे. एफ. पाटील.सोमवारी (ता. ७) ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे ‘धर्मांधतेचे लोकशाही आव्हान.’ अध्यक्ष : डॉ. अशोक चौसाळकर