गडहिंग्लजमध्ये पानपट्टीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:24+5:302021-04-30T04:31:24+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शमशुद्दीन चाँद हे शहरातील सुभाष चित्रमंदिरनजीक पानशाॅप चालवतात. लाॅकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दुकान ...

Panpatti fire in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये पानपट्टीला आग

गडहिंग्लजमध्ये पानपट्टीला आग

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शमशुद्दीन चाँद हे शहरातील सुभाष चित्रमंदिरनजीक पानशाॅप चालवतात. लाॅकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दुकान बंद आहे.

बुधवारी (२८) पहाटे साडेपाचच्या सुमारास फिरायला आलेल्या एका नागरिकाला चांद यांच्या दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली परंतु, त्यापूर्वीच दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

शमशुद्दीन चाँद यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार रविकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Panpatti fire in Gadhinglaj