शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

काकांसाठी मुन्नांचे ‘पी.एन.’ यांना साकडे

By admin | Updated: November 22, 2015 00:37 IST

काकांची उमेदवारी पुढे दामटली

कोल्हापूर : विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या सोबत राहावे, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची भेट घेऊन केली. आमदार महाडिक स्वत:, पी.एन किंवा प्रकाश आवाडे यांपैकी कुणालाही उमेदवारी द्यावी असे सांगत असताना खासदारांनी मात्र महाडिक यांच्या पाठिशी राहण्याचे आवाहन करुन काकांची उमेदवारी पुढे दामटली आहे. आतापर्यंतची पक्षनिष्ठा पाहिली, तर आपणच उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याने इतरांचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पी.एन. यांनी सांगितले. उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्ंिडग लावल्यानंतर इच्छुकांनी स्थानिक पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत. मतदारांबरोबर नेत्यांची संपर्क मोहीम जोरात सुरू आहे. शनिवारी दुपारी खासदार महाडिक यांनी शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बॅँकेत जाऊन पी. एन. यांची भेट घेतली. उमेदवारीसाठी आमदार महाडिक यांच्यासोबत राहावे, अशी विनंती त्यांनी पाटील यांना केली. आमदार महाडिक निवडून येऊ शकतात, त्यामुळे आपण सहकार्य करावे, असेही त्यांनी सूचविले. आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे उमेदवारीवर आपणच दावेदार असल्याचे पी. एन. यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. पक्षाशी असलेली निष्ठा पाहता पक्षश्रेष्ठी आपणालाच उमेदवारी देतील, त्यामुळे मी इतरांची शिफारस करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) पक्षनिष्ठेसाठी पत्करला राजेंचा रोष दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे व आपले मैत्रीचे खूप चांगले संबंध होते; पण पक्षाने लोकसभेला सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्ष आदेश मानून मंडलिक यांच्या विजयासाठी काम केले. अशा एक नाही तर अनेक निवडणुका आहेत, ज्याठिकाणी व्यक्तिगत राजकारणाची पर्वा न करता पक्षनिष्ठेला महत्त्व दिले. मग त्या निष्ठेचा पक्ष आता जरुर विचार करेल, असे पी. एन. यांनी सांगितले.