शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यात भात पेरणी, टोकणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST

सध्या सुरू असलेले लॉकडाऊन, डिझेलचे वाढलेले दर व पेरणीसाठी जनावरे मिळत नसल्याने सध्या ही कामे घरातील तरुण वर्गाला करावी ...

सध्या सुरू असलेले लॉकडाऊन, डिझेलचे वाढलेले दर व पेरणीसाठी जनावरे मिळत नसल्याने सध्या ही कामे घरातील तरुण वर्गाला करावी लागत आहेत. गेल्या आठ दिवसांत आजरा तालुक्यात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेती मशागतीची कामे व पेरणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात जवळपास ४० ते ५० टक्के क्षेत्रावर धूळवाफ पेरणी व टोकणनी केली जाते.

कमी वेळेत व कमी खर्चात यांत्रिकीकरणाच्या साह्याने गेल्या दहा ते बारा वर्षांत शेती केली जात आहे. मात्र, चालू वर्षी डिझेलचे वाढलेले दर यामुळे ट्रॅक्‍टरच्या साह्याने मशागत करणे परवडत नाही. बैलांचे औत मिळत नाही व ट्रॅक्टरचे दर परवडत नाहीत. असे असले तरी शेतकऱ्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतीची नांगरणी, बाडगे मारणे, रोटर फिरवणे व पेरणी करणे ही कामे सध्या सुरू आहेत.

धूळवाफ पेरणीसाठी शक्यतो बैलांचा वापर करून कुरीने भाताची व सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, जनावरे उपलब्ध होत नसल्याने सध्या घरातील तरुणांना कुरीला जुंपून भाताची पेरणी केली जात आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून हलक्या कुरीचा वापर केला जातो. शेतीच्या मशागतीच्या कामाबरोबर कुरी ओढण्याचे काम उत्साहाने तरुणांकडून होत आहे. आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी गावात भात, सोयाबीन पेरणी व टोकणीच्या कामाने वेग घेतला आहे.

फोटोकॅप्शन - मासेवाडी - जाधेवाडी (ता.आजरा )येथे शेतकरी बैलांऐवजी तरुणांनाच कुरीला जुंपून भाताची पेरणी करताना.

२९ आजरा भात पेरणी