हमीभावासाठी भात उत्पादकांनी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:54+5:302021-09-22T04:27:54+5:30

राज्य शासनाचे आधारभूत किंमत धान खरेदी योजनेसाठी दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे खरेदीची कामे पाहते. हंगाम २०२१-२२ साठी ...

Paddy growers should register for the guarantee till September 30 | हमीभावासाठी भात उत्पादकांनी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा

हमीभावासाठी भात उत्पादकांनी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा

राज्य शासनाचे आधारभूत किंमत धान खरेदी योजनेसाठी दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे खरेदीची कामे पाहते. हंगाम २०२१-२२ साठी शासनाने एफ. ए. क्यू प्रतीच्या भातासाठी १९६० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्या शेतकऱ्यांकरिता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. भात खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस. एम. एस. व्दारे खरेदीसाठी बोलविण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष धानाची खरेदी करण्यात येईल. खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

जिल्ह्यातील खरेदी केंद्रे-

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ लि. मार्फत, तुर्केवाडी.

चंदगड तालुका सहकारी कृषीमाल फलोत्पादन संघ लि. अडकूर.

आजरा किसान सहकारी भात खरेदी-विक्री संघ मर्या. आजरा.

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. सरवडे.

नोंदणीसाठी हे लागणार -

भात खरेदी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे होणार आहे.

खरीप २०२१-२२ मधील भात पीक लागवडीची नोंद असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा मूळ सात-बारा उतारा.

आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स.

Web Title: Paddy growers should register for the guarantee till September 30