शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पी. एन. आणि मी एकत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गोकुळचा विषय संपला आहे. कॉंग्रेस म्हणून पी. एन. पाटील आणि मी एकत्रच आहोत. यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

कोल्हापूर : गोकुळचा विषय संपला आहे. कॉंग्रेस म्हणून पी. एन. पाटील आणि मी एकत्रच आहोत. यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढवणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अलिकडेच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांचे राजकीय विरोधक माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यासोबत राहिले. या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी बाजी मारली. दरम्यान, एकाच पक्षात असूनही गोकुळच्या निवडणुकीत परस्पर विरोधी राजकीय भूमिका घेतल्याने पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाल्याच्या भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्या होत्या. निवडणुकीनंतर हे दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले नव्हते. रविवारी कॉंग्रेस कमिटी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात निदर्शनावेळी पाहिल्यांदा हे दोघेही एकत्र आले. पी. एन. पाटील नंतर सतेज पाटील निदर्शनाच्या ठिकाणी दाखल झाले. दोघांनी एकमेकांकडे पाहत स्मितहास्य केले. त्यांच्या स्मितहास्याकडे पदाधिकारी, कार्यकर्तेही लक्ष देवून पाहताना दिसले.

दरम्यान, निदर्शनानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांना तुम्ही आणि आमदार पी. एन. पाटील पहिल्यांदाच एकत्र आल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावर आम्ही दोघेही एकत्रच असल्याचा त्यांनी खुलासा केला.