शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळघर मालकही आर्थिक अरिष्टात..

By admin | Updated: November 21, 2014 00:36 IST

२५ ते ३० हवे मनुष्यबळ : गुऱ्हाळघर उभारणीस २५ लाखांचा खर्च .

प्रकाश पाटील - कोपार्डे -ग्रामीण भागात ज्यांची चार ते पाच एकर शेती आहे, असे शेतकरीच शेती सांभाळत छोटासा व्यवसाय म्हणून गुऱ्हाळघराची उभारणी करतात. या व्यवसायासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ, स्थावर मालमत्ता गुंतविताना गुऱ्हाळघर मालकांच्या आवाक्याबाहेर गेले असून, एका गुऱ्हाळघरासाठी किमान २५ लाखांची गुंतवणूक करून स्वत:ची एकर, दीड एकर जमीन गुंतवावी लागते.एक गुऱ्हाळघर उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी स्वत:ची किमान एकरभर जमीन लागते. गुऱ्हाळघरासाठी ऊसतोड मजुरांसह घाणकरी, गुळवे अशी एकूण २५ मजुरांची आवश्यकता असून, प्रत्येक मजुराला त्याच्या कामाप्रमाणे २५० ते ४०० रुपये मजुरी द्यावी लागते. हे मजूर आपल्याकडे हंगामात कामासाठी यावेत यासाठी १५ ते २० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. गुऱ्हाळघर उभारणारे शेतकरी हे सर्वसामान्य असतात. त्यामुळे त्यांना पैसे उभा करण्यासाठी बॅँक, अडते व व्यापारी यांच्याकडे बिगर हंगामात हात पसरावे लागतात. यात बॅँका जरी कमी व्याजदराने पैसे देत असले तरी व्यापारी व अडत दुकानदार उचललेल्या पैशावर २० ते २५ टक्के व्याजदर लावतात. एवढे करून जर गुळाचे दर पडल्यास शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघराला पाठवत नाहीत. त्यावेळी त्यावेळी स्वत:चा ऊस गाळावा लागतो. कारण मजुराची सध्या २५० रुपये दिवसाला मजुरी व एक किलो गूळ द्यावा लागतो. तर गुळव्याला ४०० रुपये व दोन किलो गूळ द्यावा लागतो. दिवसाला किमान या मजुरांची सहा हजार २५० रुपये मजुरी होते. जिल्ह्यातील १३०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४२५ गुऱ्हाळघरे सुरू आहेत. शिंदेवाडी (ता. करवीर) येथील गुऱ्हाळघर मालकांने तर, गुऱ्हाळघर म्हणजे हत्ती पाळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया देताना यावर्षी गुऱ्हाळघर बंद करून ट्रॅक्टर कारखान्याला लावल्याची प्रतिक्रिया दिली.