शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हजार ग्रामस्थांपैकी ४४ जण व्याधीग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या दैनंदिन सर्वेक्षणामध्ये एक हजार ...

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या दैनंदिन सर्वेक्षणामध्ये एक हजार ग्रामस्थांपैकी ४४ जण व्याधीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी दिवसभरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले असून यातील ५२ ग्रामस्थांचे कोरोनाचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

आरोग्य विभागाने १ एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या ११९७ गावांमध्ये २७९३ पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू आहे. दर पाच दिवसांनी हे सर्वेक्षण करण्यात येते. या अंतर्गत ७ लाख ५७ हजार ६८० घरांपैकी ८३ हजार ५११ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. १ एप्रिलपासून आतापर्यंत ११ लाख ३७ हजार ६६४ घरांमधील ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांची माहिती घेतली असता सोमवारी दिवसभरामध्ये ८०५४ व्यक्ती व्याधीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले असून आतापर्यंत गेल्या २६ दिवसांमध्ये १ लाख २९ हजार ०९६ जण व्याधीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे दरहजारी प्रमाण काढले असता ते ४४ इतके असून या ग्रामस्थांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या व्याधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील तीव्र श्वसनाचा त्रास असलेल्यांची संख्या अतिशय कमी असून ती २५ इतकी आहे.

अनेक ठिकाणी ग्रामस्थ कोरोनाची लक्षणे असतानाही चाचणीसाठी जात नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जाणीवपूर्वक कोरोना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ५३८ जणांना कोरोना चाचणीसाठी संदर्भीत करण्यात आले. यातील १९७ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट

एकूण प्राथमिक केंद्रे ७५

गावांची संख्या ११९७

कार्यरत पथकांची संख्या २७९३

१ एप्रिलपासून सर्वेक्षण केलेली घरे ११ लाख ३७ हजार ६६४

तापसदृश्य लक्षणे आढळलेले ग्रामस्थ १० हजार २९९

तीव्र श्वसन दाह असलेले ग्रामस्थ २५

अन्य व्याधीग्रस्त १ लाख २९ हजार ०९६

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण १९७