शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...नाही तर आम्ही सरकार घालवू

By admin | Updated: May 25, 2014 01:16 IST

‘एलबीटी’प्रश्नी व्यापार्‍यांचा इशारा : सांगलीत उद्या पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार्‍यांचा मेळावा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत जशी व्यापार्‍यांनी ताकद दाखवली तशी ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवू,असे सांगत ‘एलबीटी घालवा, नाही तर आम्ही तुम्हाला घालवू’असा निर्वाणीचा इशारा व्यापार्‍यांनी आज, आघाडी सरकारला दिला. कोल्हापूर उद्योजक व व्यापारी महासंघाची बैठक आज (शनिवार) स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी झाली. अध्यक्षस्थानी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगांवकर होते. राज्य शासनाने मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) एक टक्का वाढवून विनापर्याय एलबीटी रद्द करावा, अशी मागणीही यावेळी व्यापार्‍यांनी केली. दरम्यान, सांगली येथे सोमवारी, दि.२६ होणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार्‍यांच्या मेळाव्याला कोल्हापूर शहरातून ५० हून अधिक व्यापारी प्रतिनिधींनी जाण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेतला. निमंत्रक सदानंद कोरगांवकर म्हणाले, गेली साडेतीन वर्षे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा लढा सुरू आहे. इतर राज्यांत जकात सुरू आहे, मात्र महाराष्ट्रात जकात रद्द करून राज्य शासनाने एलबीटी सुरू केला. त्याला राज्यातील व्यापार्‍यांचा तीव्र विरोध आहे. व्हॅटमध्येच एक टक्का वाढवून एलबीटी रद्द करावा,अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू,असे कोरगांवकर यांनी सांगून २ जूनला राज्य अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले. गणेश बुरसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत व्यापार्‍यांनी ताकद दाखविली आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या ३३ खासदारांचा पराभव झाला आहे. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घ्यावा. बैठकीस सुरेश गायकवाड (पतौडी), सुधीर आपटे, संजय रामचंदानी आदींनी मते व्यक्त केली. बैठकीत व्यापारी व उद्योजकांनी एलबीटीला जोरदार विरोध केला. अमर क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बैठकीस प्रवीणभाई शहा, बाबा महाडिक, मधुकर हरेल यांच्यासह व्यापारी, उद्योजक उपस्थित होते . सचिन शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)