शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा कर्नाटकात घुसू

By admin | Updated: August 4, 2014 00:16 IST

विद्या चव्हाण यांचा इशारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दीड तास ‘रास्ता रोको’

कागल : कर्नाटक सरकारच्या वरवंट्याखाली अनेक वर्षे भरडला जात असलेल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तेथील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरसारखा अत्याचार पुन्हा केला, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण यांनी आज, रविवारी दिला. ‘येळ्ळूर’ येथे कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज, रविवारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्यावतीने पुणे-बंगलोर महामार्गावर महाराष्ट्र कर्नाटक सीमा असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, येळ्ळूर येथे महिला, बालकांवरही भ्याड लाठी हल्ला झाल्याने तमाम मराठी भाषिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्या आज बेळगावमार्गे येळ्ळूरला जाण्यासाठी येथे आल्या होत्या. आम्ही त्यांना पाठबळ देण्यासाठी येथे आंदोलनात उतरलो आहोत. आमदार चव्हाण म्हणाल्या, कर्नाटक पोलिसांनी आम्हाला रोखले असले तरी यापुढच्या काळात गनिमी काव्याने कर्नाटकात जाऊ. आमच्या मराठी भाषिकांना धीर देण्यासाठी आम्ही जात राहू. कर्नाटक पोलिसांच्या कारवाईला भीक घालणार नाही. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आ. के. पी. पाटील, आ. संध्यादेवी कुपेकर, भैया माने, आशाकाकी माने, निवेदिता माने, उषाताई दराडे, संगीता खाडे, वैशाली नागोडे, सुरेखा पाटील, शिवानंद माळी, मालोजी अष्टेकर, आदींचीही भाषणे झाली. (प्रतिनिधी)