शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निदर्शने

By admin | Updated: May 12, 2015 00:34 IST

साखर, ऊसकामगार परिषद : प्रश्न दहा दिवसांत सोडविण्याची ‘डेडलाईन’

कोल्हापूर : शासनाने ऊस उत्पादक, ऊस तोडणी वाहतूक कामगार व साखर कामगार यांच्या प्रश्नांबाबत दिलेल्या आश्वासनांची येत्या दहा दिवसांत सोडवणूक न केल्यास मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमांत निदर्शने करू, असा इशारा सोमवारी देण्यात आला. ऊस उत्पादक, साखर कामगार व ऊस तोडणी-वाहतूक कामगार यांच्या राज्यव्यापी परिषदेत हा वज्रनिर्धार करण्यात आला.राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे जनरल सेक्रेटरी डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी साखर कामगार संघटना समन्वय समितीचे उद्धव भवलकर, ऊस तोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, डॉ. अजित नवले, संभाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.परिषदेत, शासनाने ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या मजूरवाढीसाठीचा करार केलेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांची तीन हजार कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले कारखान्याकडे थकीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात २० टक्के हंगामी वाढ जाहीर करूनही त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ऊस उत्पादकांसाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर केले आहे; परंतु त्यामधील एक रुपयादेखील सरकारने दिलेला नाही. येत्या दहा दिवसांत म्हणजे २२ मेपर्यंत या तिन्ही घटकांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या जाहीर कार्यक्रमात निदर्शने करून जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. डी. एल. कराड म्हणाले, राज्यातील आमदार-खासदारांनी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून स्वत:च्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०२ वरून १३२ वरती पोहोचली आहे, तर खासगी साखर कारखान्यांची संख्या २ वरून ८१ वरती पोहोचली आहे. अनेक साखर कारखान्यांमधील दहा वर्षांपासून पगार मिळालेला नाही. राज्यातील ८० टक्के कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे दर दिलेला नाही. अशा कारखान्यांवर कारवाईचे अधिकार असताना मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.सुभाष जाधव यांनी साखर उद्योगातील प्रलंबित दहा मागण्या पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे केली. प्रा. आबासाहेब चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आण्णा सावंत, नामदेव राठोड, दत्ता डाके, सय्यद रझाक, अशोक लहाने, आप्पा परीट, दिनकर आदमापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)साखर कामगारांचे भवितव्य गंभीरउद्धव भवलकर म्हणाले, सरकारने घोषणा करून एक वर्ष झाले तरी साखर कामगारांच्या वेतन पुनर्रचनेसाठी अद्याप कमिटी स्थापन केलेली नाही. तुटपुंज्या वेतनावर साखर कामगारांना गुजराण करावी लागत आहे. बंद व आजारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार पुढाकार घेत नाही. त्यामुळे शेतकरी आणि कामगार वर्गाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील ४२ साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री झाली आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे समजते. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तिन्ही घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.