शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात : अनिल स्वरूप

By admin | Updated: March 8, 2017 17:59 IST

शाळांना दिल्या भेटी, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात

 प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारककोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असून शाळांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. इतर राज्यांतील शिक्षक, अधिकारी व मान्यवरांनी या शाळा पाहाव्यात, असे चांगले उपक्रम शाळा-शाळांमधून राबविले जात असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या आणि कामकाजाचे कौतुक केले. ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेची पटसंख्या १४२ असून शाळेला ‘आयएसओ मानांकन’प्राप्त झाले आहे. शाळेमधील ज्ञानरचनावाद, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण, तिसरीपासून सातवीपर्यंत संगणक हाताळणारे विद्यार्थी, साडेतीन लाख रुपयांच्या लोकसहभागातून केलेला शैक्षणिक उठाव, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश स्टेशन, सुसज्ज रंगकाम या भौतिक सुविधा पाहून सचिव प्रभावित झाले. अभिनव पालकर याचा देशापातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करतानाच विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण ऐकूनही त्यांनी समाधान व्यक्त केले. याच तालुक्यातील करंबळी तालुक्यातील सहावीचे ३४ विद्यार्थी टॅबचा वापर करतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील शिक्षक अध्यापनात स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात त्याचे सचिवांनी कौतुक केले. या शाळेत चार लाख ३९ हजारचा शैक्षणिक उठाव झाला आहे. कन्या विद्यामंदिर (ता. हातकणंगले)येथील लेझीम पथक, पहिलीच्या वर्गात राबविण्यात येणारा शब्दांचा डोंगर व शब्दांची अंताक्षरी याचे वाचन त्यांनी घेतले. स्वच्छ सुंदर मुलगी-आजची राजकुमारी, वाचनकट्टा, तरंग वाचनालय या उपक्रमांची पाहणी केली. जिल्ह्यातील चांगल्या उपक्रमांचे एकत्रिकरण करून ते दिल्लीला पाठवून द्यावेत. अन्य राज्यांतील शिक्षक हे उपक्रम पाहण्यासाठी कोल्हापूरला येतील तसेच अन्य राज्यांतही असे उपक्रम राबविण्याबाबत आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे स्वरूप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सभापती मीना पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.