शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

गोरे बंधूसह तेरा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: January 11, 2015 00:30 IST

बोथे स्फोट : एटीएसने केली घटनास्थळाची पाहणी

सातारा : माण तालुक्यातील बोथे जिलेटिन स्फोटप्रकरणी ‘बोथे विंड फार्मा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘कमल एंटरप्रायजेस’वर सदोष मनुष्यवध तसेच भारतीय स्फोटके अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ‘कमल एंटरप्रायजेस’चे संचालक शेखर, अंकुश, इरफान, राजेश तसेच ‘बोथे विंड फार्मा’चे अरविंद मन्सल, सूरज बारी, आशिष स्वरूप, आर. के. शर्मा, अरुण फूल, राजेंद्र व्हटकर, ए. प्रतिभान, राकेश विश्वकर्मा, अर्पित वाजपेयी यांचा समावेश आहे.
माण तालुक्यातील बोथे येथे शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झालेल्या जिलेटिन कांड्याच्या स्फोटात दादासाहेब जगदाळे, संदीप माने, शशिकांत कुलकर्णी हे ठार, तर जावेद मुलाणी, संदीप घाडगे, सूर्याजी शिंदे, शिवाजी सातव, बापू घाडगे हे जखमी झाले होते.
बोथे घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मात्र, स्फोट ज्या ठिकाणी झाला ते शेड ‘कंटिनम एनर्जी’, ‘बोथे विंड फार्मा’ की ‘कमल एंटरप्रायजेस’चे आहे, याचीच माहिती घेण्याचे काम सुरू होते. मात्र, हे शेड ‘कमल एंटरप्रायजेस’चे असून, येथील जिलेटिन ‘बोथे विंड फार्मा’ आणि ‘कमल एंटरप्रायजेस’चे असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. या प्रकरणात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी स्वत: फिर्याद दिली असून, तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.
दरम्यान, शनिवारी येथे दहशतवादविरोधी पथक तथा ‘एटीएस’ आणि भारतीय स्फोटके संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून आलेले पथक दहिवडी पोलीस ठाण्यात या संबंधात माहिती घेत होते.
संशयितांच्या शोधासाठी एलसीबी
पोलीस उपाधीक्षक राहुल माकणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणात शेखर गोरे, अंकुश गोरे यांच्यासह तेराजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये बोथे विंड फार्मा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कमल एंटरप्रायजेसचे संचालक तसेच कर्मचारी आहेत. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना शुक्रवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली होती. तीन कर्मचारी अजूनही दहिवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची माहिती काही प्रमाणात दहिवडी पोलिसांना उपलब्ध नाही. परिणामी त्यांच्या शोधासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली असून, ती विविध भागांमध्ये पाठविण्यात आली आहेत. ही पथके कोणत्या भागात पाठविण्यात आली आहेत, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. (प्रतिनिधी)