लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. तरी या वेबसिरीजवर तत्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी केली.
अनिर्बंध वेबसिरीजवर अंकुश लावण्यासाठी‘सेन्सॉर’ करणारी यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, ज्या कंपनीद्वारे ही सिरीज प्रसारित केली जात आहे त्यांनी यापूर्वी राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, नकाशाचे विकृतीकरण , हिंदू महिलांविषयीच्या आक्षेपार्ह पुस्तकांची विक्री असे प्रकार केले आहेत, तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव, विश्व हिंदू परिषदेचे अशोक रामचंदानी, शशी बिडकर, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
--
फोटो नं २००१२०२१-कोल-हिंदुत्ववादी संघटना
ओळ : कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना तांडव वेबसिरीजवर बंदी आणावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.