इब्राहिमपूर शौचालय घोटाळ्यातील रक्कम जमा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:13+5:302021-02-08T04:21:13+5:30

चंदगड : इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या शौचालय अनुदान वितरणात ...

Order to deposit money in Ibrahimpur toilet scam | इब्राहिमपूर शौचालय घोटाळ्यातील रक्कम जमा करण्याचे आदेश

इब्राहिमपूर शौचालय घोटाळ्यातील रक्कम जमा करण्याचे आदेश

चंदगड : इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथे स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या शौचालय अनुदान वितरणात झालेल्या अनियमितता गैरव्यवहारातील दुबार तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच दुबार आणि अपात्र लाभार्थ्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे अखेर या शौचालय अनुदान घोटाळ्यातील कारवाईला वेग आला आहे. इब्राहिमपूर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणात गैरप्रकार झाला होता. त्याअनुषंगाने अनुदान वितरणामध्ये अनियमितता झाल्याबाबतचा अहवाल चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी सादर केला होता. त्यामध्ये याप्रकरणी अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या अहवालामध्ये अनुदान वितरण केलेल्या लाभार्थींना दुबार लाभ दिला आहे की नाही, याची स्पष्टता केलेली नसल्याने दुबार लाभार्थी तसेच अपात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागविली आहे. तसेच त्यांना दिलेली प्रोत्साहन अनुदान रक्कम १५ फेब्रुवारीपर्यंत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Order to deposit money in Ibrahimpur toilet scam