शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅट’चा पर्यायही अमान्य

By admin | Updated: June 14, 2014 01:26 IST

थेट वसुली अधिकाराची करप्रणाली द्या : महापालिकेची स्वायत्तता अबाधित राखा

कोल्हापूर : किचकट अटी वगळून एलबीटी किंवा पारदर्शकतेवर भर देणारी नवीन जकात प्रणाली व्यापाऱ्यांना मान्य नाही; तर व्यापाऱ्यांची मागणी असलेला व्हॅट करावर अधिभार हा पर्याय स्वीकारण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. एलबीटीऐवजी कोणताही पर्याय द्या; मात्र यामध्ये महापालिकेची स्वायत्तता अबाधित राहून थेट वसुलीचा अधिकार असावा, अशी मागणी करणारा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठविण्याचे आज, शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत ठरले. आता एलबीटी पर्यायांचा चेंडू पुन्हा राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महापालिकांनी शहरातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून ‘एलबीटी’साठी पर्याय सुचविण्याचे आदेश मंगळवारी (दि. १०) दिले होते. या पार्श्वभूमीवर काल, गुरुवारी महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात शहरातील प्रमुख व्यापारी संघटनांशी महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक झाली होती. यावेळी व्यापारी संघटनांनी कालबाह्य जकातीबाबत चर्चाही नको; तसेच कामधंदा सोडून दप्तर सांभाळावयास लावणारी एलबीटी करप्रणालीही नको. व्हॅटवर एक टक्का वाढवून पालिकेने राज्य शासनाकडून हिस्सा घ्यावा, अशी मागणी केली होती. या अनुषंगाने आज महापालिकेत महापौर सुनीता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, एलबीटी विभागप्रमुख संजय सरनाईक, आदींसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.संजय सरनाईक यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती व उपलब्ध निधी यांचा लेखाजोखा मांडला. महापालिकेला दरवर्षी ठरावीक वाढ देत येत्या आर्थिक वर्षात किमान दीडशे ते दोनशे कोटी रुपये एलबीटी किंवा तत्सम पर्यायांतून मिळणे गरजेचे आहे. इतकी रक्कम मिळाल्याखेरीज मोठ्या प्रकल्पांचा खर्च व व्याज, आदी भागविणे अवघड असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.एलबीटी प्रणाली रद्द करणार असल्यास पारदर्शक तत्त्वे असणारी जकात सुरू करावी. हे शक्य नसल्यास महापालिकेला थेट उत्पन्नाचे साधन असणारी तसेच महापालिकेतर्फेच वसुली करता येणारी करप्रणाली द्यावी. जेणेकरून पालिका प्रशासनास शासनाच्या निधीची वाट पाहावी लागणार नाही. वसुली क्षमता वाढविल्यास करातून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ होईल. महापालिकेची स्वायत्त संस्था ही संकल्पना कायम राहील. अशा प्रकारची करप्रणाली जारी करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्याचे बैठकीत सर्वांनुमते ठरले. (प्रतिनिधी)