कोरोनाचे केवळ तीन नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:09+5:302021-02-09T04:27:09+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत केवळ ३ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. ...

Only three new patients with corona | कोरोनाचे केवळ तीन नवे रुग्ण

कोरोनाचे केवळ तीन नवे रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत केवळ ३ नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातील एक आणि आजरा तालुक्यातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही महिन्यांमधील सर्वांत नीचांकी आणि दिलासादायक असा हा आकडा आहे.

दिवसभरामध्ये २९७ जणांची तपासणी करण्यात आली असून, ६७६ जणांचे स्वॅब घेण्यात आले, तर १०० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. ११५ जणांवर उपचार सुरू असून, तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेले काही महिने रोज १० ते २० अशा पद्धतीने नवे कोरोनाचे रुग्ण आढळत होते. परंतु, सोमवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये केवळ तीन रुग्ण आढळल्याने हा मोठा दिलासा मानला जातो. गेल्या महिनाभरात दोन ते तीन वेळा बाराही तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु, कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात मात्र किमान सात आणि जास्तीज जास्त बारा, तेरा असे रुग्ण सापडत होते. परंतु, महापालिका क्षेत्रातही केवळ एक रुग्ण सापडला आहे.

Web Title: Only three new patients with corona