कोल्हापूर : स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्याच नावाचा विचार व्हावा, यावरून कार्यकर्त्यांत निर्माण झालेला असंतोष शमविण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी पाच वर्षांवरून पंधरा महिन्यांवर आणण्याची वेळ भाजपसह काँग्रेस, शिंदेसेना यांच्यावर आली आहे. भाजपने प्रथम हा निर्णय घेतला आणि पाठोपाठ काँग्रेसनेसुद्धा तसाच निर्णय घेतला. मंगळवारी स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत आठ जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडीवर शुक्रवारी सकाळी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले जाईल.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवडीनंतर गटनेत्यांची निवड झाली. विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर यांची निवड काँग्रेसने केली असून, तसे पत्र महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आले. परंतु, महापौरांनी आयुक्तांकडे अद्याप तशी शिफारस केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निवडीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली.मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळी ११:०० ते दुपारी २:०० यावेळेत भाजपकडून तीन, काँग्रेसकडून तीन, तर शिंदेसेनेकडून दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी हे अर्ज स्वीकारले.तीन्ही पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कमालीचा आग्रह धरला होता. त्यामुळे नावांवर एकमत करणे, नेते मंडळींना काहीसे कठीण जात होते. इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. जेंव्हा नावे जाहीर करण्यात आली तेंव्हा तर अन्य इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळे ‘स्वीकृत’साठीचा पाच वर्षांचा कालावधी कमी करून तो सव्वा वर्ष करण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागली. भाजपने तसा निर्णय घेताच पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही घेतला. त्यामुळे आता नाराज झालेल्या इच्छुकांना पुढे संधी मिळणार असल्याने ही नाराजी शमविण्यात नेते यशस्वी झाले.
कुणाकडून कुणाला संधी?भाजप : प्रा. जयंत पाटील, महानगर अध्यक्ष विजय जाधव, सुनील वाडकरकाँग्रेस : सुनील मोदी (उद्धवसेना), राहुल माने, मुस्ताक मलबारीशिंदेसेना : रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण शुक्रवारी आयुक्त करणार शिफारस.
शुक्रवारी होणार निवडशुक्रवारी सकाळी ११:०० वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असून, त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आज दाखल झालेल्या अर्जानुसार आयुक्त के. मंजुलक्ष्मी या महासभेसमोर या नावांची शिफारस करतील, त्यानंतर एकमताने या निवडी झाल्याचे महापौर रुपाराणी निकम जाहीर करतील.
Web Summary : Kolhapur parties reduce nominated corporator terms to quell dissent. BJP, Congress, and Shinde Sena nominate candidates. The decision aims to appease disgruntled members with future opportunities after initial disagreements.
Web Summary : कोल्हापुर में पार्टियों ने असंतोष को शांत करने के लिए मनोनीत पार्षद का कार्यकाल कम किया। बीजेपी, कांग्रेस और शिंदे सेना ने उम्मीदवार नामित किए। इस निर्णय का उद्देश्य शुरुआती असहमति के बाद असंतुष्ट सदस्यों को भविष्य में अवसर देना है।