शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

वहिवाट अडवली, चाळीस एकर उसाची तोड खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

एकीकडे जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची चळवळ उभी राहिली असताना दुसरीकडे मात्र, अशी अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त ...

एकीकडे जिल्ह्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची चळवळ उभी राहिली असताना दुसरीकडे मात्र, अशी अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. उचगाव येथील जुन्या विजापूर रस्त्यावर उचगाव रेल्वे गेट क्रमांक २५ होत आहे. गेट अपुरे असल्याने दक्षिणेकडील शेतकऱ्यांना ये-जा करणे, उसाची वाहतूक करण्याची अडचण निर्माण झाली होती. येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने अंडर ब्रीजचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या अंडर ब्रीजखालून ऊस वाहतूक करणे सोपे झाले आहे. दक्षिणेकडील वहिवाटीच्या रस्त्यावरून उसाची वाहतूक होते. ही वहिवाट काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातूनच सोडल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच सोय झाली होती. मात्र यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव येथील वाहतूक रोखली आहे. हा वहिवाटीचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी काम सुरू असतानाच हे कामही थांबले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांच्या ऊसतोडी थांबल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदार यांना तक्रार दिली आहे तहसीलदारांनी येथील मंडल अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारी येथील पाहणी झाल्यानंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

फोटो : १९ उचगाव रस्ता

ओळ-:

उचगाव येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले रेल्वे अंडर ब्रीजचे काम थांबले आहे. त्यासाठी सर्व शेतकरी एकत्र आले आहेत. छाया : अनिल निगडे