शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मनकर्णिका कुंडाच्या कामात माउली लाॅजकडून अडवणूक; न्यायालयातून स्थगिती : देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण, महापालिकेचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

ते म्हणाले, अंबाबाईच्या स्नानाचे पाणी जाते त्या पुरातन मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या परिसरावर देवस्थान ...

ते म्हणाले, अंबाबाईच्या स्नानाचे पाणी जाते त्या पुरातन मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या परिसरावर देवस्थान समितीची मालकी असून, कुंड मुजवल्यानंतर त्या शेजारील माउली लॉजचे उपयोगात नसलेले एक ऑफिस कुंडावर बांधण्यात आले आहे. उत्खननादरम्यान ही बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जागेची मोजणी करून घेतली व महापालिकेला हे अतक्रिमण काढण्याची विनंती केली. मात्र, महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही.

समितीने लॉजमालकांशी चर्चा केली, देवीचे काम आहे सहकार्य करा अशी विनंती केल्यावर समोर होकार दिला आणि नंतर देवस्थान विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या लॉजचे बांधकाम बेकायदेशीर झाले असून, कम्प्लिशन सर्टिफिकेट, महापालिकेची एनओसी अशा कोणत्याही नियमावलीचे पालन केले नाही. उलट समितीच्याच जागेवर केलेले अतक्रिमित बांधकाम पाडू नये म्हणून स्थगिती आणली आहे. शिवाय सुरक्षिततेसाठी लावलेले पडदेही दोनदा काढून टाकले आहेत.

---

फूलवाल्यांचे मोठे सहकार्य

उत्खननासाठी हातावरचे पोट असलेल्या फूलवाल्यांनी मोठे सहकार्य केले. चर्चेनंतर तातडीने दुकाने उतरवून घेतली व पुढे १५ फूट जागेत नव्याने कमी जागेत दुकाने उभारली. देवीसाठी सर्व घटकांचे सहकार्य होत असताान माउली लॉजने घातलेल्या आडकाठीमुळे त्या भागातील उत्खननाने काम थांबले आहे.

---

देवस्थानच्या अतिक्रमण झालेल्या जागेत कुंडात उतरण्यासाठीच्या पायऱ्या आहेत. येथील उत्खनन करताना इमारत पडण्याची शक्यता आहे. माउली लॉजचे मालक देवीच्याच कृपेने व्यवसाय करत आहेत आणि तिच्याच कामात अडवणूक करत आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ त्यांच्यावर कारवाई करावी.

महेश जाधव (अध्यक्ष प. म. देवस्थान समिती)

--