शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ...

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

गेले पंधरा दिवस १४०० च्या वर रोज कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या येत होती. ती सोमवारी १२०० च्या आत आली आहे. कोल्हापूर शहरात ३४० जणांना कोरोनाची बाधा झाली असून करवीर तालुक्यात १८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगलेत तालुक्यात १२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

कोल्हापूर ०७

राजारामपुरी, कोल्हापूर, शिवाजी पेठ, साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी २, विक्रमनगर

हातकणंगले ०७

साजणी, चंदूर, आळते, हालोंडी, नागाव, हेर्ले, पेठवडगाव

करवीर ०५

दऱ्याचे वडगाव, खुपिरे, वडणगे, म्हारूळ, आर. के. नगर

शिरोळ ०५

टाकवडे, दत्तवाड, सैनिक टाकळी, औरवाड, जयसिंगपूर

इचलकरंजी ०४

गावभाग, लिंगडे मळा, इचलकरंजी २

चंदगड ०२

किटवाड, बोक्याल

गडहिंग्लज ०१

आजरा ०१

मुमेवाडी

पन्हाळा ०१

बोरपाडळे

गगनबावडा ०१

मुटकेश्वर

इतर ०३

इस्लामपूर, शेमनेवाडी, विजयदुर्ग