शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणाने बैलांची संख्या घटली

By admin | Updated: July 11, 2014 00:11 IST

दूध व्यवसायाचाही बैलांच्या संगोपनावर परिणाम : जिल्ह्यात ‘देशी’, ‘खिल्लारी’ दोनच जाती

कोल्हापूर : जिल्ह्यात देशी, खिल्लारी, एच.एफ. संकरित व जर्शी संकरित या जातींचे बैलच आढळतात. यामध्ये प्रामुख्याने देशी व खिल्लारी जातींच्या बैलांची संख्या लक्षणीय आहे. उर्वरित महाराष्ट्रात आढळणारे ‘डांगी’ व ‘गीर’ जातींचे बैल येथे दिसत नाहीत. गेल्या १५ वर्षांत जिल्'ात दूध व्यवसायाने बदललेल्या जीवनाचा थेट परिणाम बैलांच्या संख्येवर झालेला दिसतो. पूर्वी प्रत्येक घरात एक तरी देशी गाय होती. आता देशी गायींची संख्या कमी झाली आहे. देशी गायींची जागा जादा दूध देणाऱ्या संकरित गायींनी घेतली आहे. संकरित गायींपासून जन्मलेल्या नर वासरांच्या संगोपनाची मानसिकता शेतकऱ्यांची नसते. मादी वासरू असेल तरच त्याचे संगोपन केले जाते. त्यामुळे एकीकडे संकरित गायींची संख्या वाढली असली तरी त्या पटीत संकरित बैलांची संख्या वाढलेली दिसत नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा उदय झाला, पण गेल्या दहा वर्षांत दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. दहा दिवसाला मिळणाऱ्या दुधाच्या बिलामुळे शेतकरी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. पूर्वी दोन बैलांच्या जोडीला गोठ्यात एक-दोन म्हैस किंवा गाय असायची. आता गोठ्यांचे चित्र बदलले आहे. जमीन आहे तेवढीच आहे, पण कुटुंबांची संख्या वाढली आहे. मशागतीचे क्षेत्र कमी झाल्याने बैलजोडी पाळणे परवडत नाही. वर्षातून दोनवेळा मशागत करण्यासाठी रोटावेटर, लहान ट्रॅक्टरचा वापर करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. त्यासाठी ५० हजारांची बैलजोडी वर्षभर सांभाळणे आर्थिकदृष्ट्या बेहिशेबी वाटत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाकडे वळला आहे.