शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जयसिंगराव तलाव क्षेत्रात पक्ष्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 21, 2015 00:10 IST

वनमित्र संस्थेची पाहणी : पाणीपातळी घटल्याचा परिणाम, जैव विविधतेवरही परिणाम

कागल : कागलच्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कमी होण्याचे प्रमाण गेले तीन-चार वर्षे कायम आहे. पाणी पातळी कमी होण्याची विविध कारणे असून, त्याचे परिणामही जाणवत आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने तलाव क्षेत्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत असून, या तलाव क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतही घट होत आहे. येथील वनमित्र संस्थेने वन्यजीव सप्ताहादरम्यान केलेल्या निरीक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. गडकोट स्वच्छता मोहीम, निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गेली सात वर्षे या जयसिंगराव तलावाच्या क्षेत्रातील जैवविविधतेचा अभ्यास सुरू ठेवला आहे. त्यांनी साधारणत: तलावाच्या पाण्यात राहणारे आणि तलावाच्या भोवती असणाऱ्या जंगल-वृक्ष क्षेत्रात राहणारे पक्षी आणि दरवर्षी स्थलांतर करून येणारे परदेशी पाहुणे पक्षी यांची यादी तयार केली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी असते. मात्र, या तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मानवी अतिक्रमण वाढत आहे. तलाव क्षेत्रातील नैसर्गिक वृक्षसंपदा कमी होत आहे. यामुळे जवळपास डझनभर जातींचे पक्षी यावर्षी इकडे फिरकलेच नाहीत, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे पक्षीही कमी होत आहेत. तलावाच्या बाह्य क्षेत्रात ही अवस्था असेल, तर तलाव क्षेत्रातही जैवविविधतेवर परिणाम होत असण्याची शक्यता आहे. कागल नगरपालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणूनही विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीसुद्धा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दरवर्षी अडथळे येत आहेत. वनमित्र संस्थेने केलेल्या निरीक्षणावेळी येथील श्री शाहू हायस्कूल, यशवंतराव घाटगे हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, अशोक शिरोळे, प्रवीण जाधव, कार्तिक परीट, कैलास पाटील, काशीनाथ गारगोटे, महादेव कवठे, विक्रम चव्हाण, लखन मुरगुडे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले. तलाव क्षेत्रातील कायम रहिवासी पक्षीपांढरा टिळा असणारा वारकरी पक्षी, पाणकावळा, ढोकरी बगळा, खंड्या, टिटवी, गोरली, चंडोल, अबलक धोबी, मोठा बगळा, गाय बगळा, नदी कुररी, बंड्या, टिबक्याची मनोली, पाकोळी, उंदीर घार, वेडा राघू हे कायम वास्तव्य करणारे पक्षी या निरीक्षणादरम्यान दिसले. मात्र, त्यांची संख्या कमी होत आहे. जमिनीवरील आणि झाडांवरील घरट्यांचीही पाहणी करण्यात आली. परदेशी पाहुणेश्रीलंकन बेटावरून स्थलांतर करून येणाऱ्या घनसर या पक्ष्याची जोडी निरीक्षणात आढळली. ब्राह्मणी घारींची जोडीही दिसली. मात्र पाणलावा, शेकाट्या, कंकर, अंधार ढोकरी, चाटू, जांभळी, पाणकोंबडी, चाम ढोक, घोगल्या कोंडा, कामऱ्या ढोक हे स्थलांतरित पक्षी आढळले नाहीत. दरवर्षी ही संख्या घटत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील विविध घटक नष्ट होत असल्याने पक्षीही अन्य ठिकाणी जाणे पसंत करतात. कागलच्या जयसिंगराव तलावाच्या विकासवाडी, वनीकरणाकडील बाजूस विविध जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. मात्र, ती दिवसेंदिवस कमी होत आहे. शासन आणि लोकसहभागातून याबद्दल जनजागृती करून उपाययोजना करण्याची गरज आहे. - राजेंद्र घोरपडे, अध्यक्ष, वनमित्र संघटना, कागल