शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

आता शंभर पटास मुख्याध्यापक मिळणार

By admin | Updated: August 31, 2015 00:17 IST

अतिरिक्त शिक्षक प्रमाण कमी होणार

कोल्हापूर : राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता शंभर पटास मुख्याध्यापकपद मंजूर होणार आहे. या शासन निर्णयात पटाचे निकष बदलल्यामुळे राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी होऊन नवीन भरती करावी लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व सरचिटणीस विजय भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.बालकाचा शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना १५० पटास आणि सहावी ते आठवीच्या वर्गांना शंभर पटास मुख्याध्यापकपद अनुज्ञेय आहे. मात्र, इयत्ता पहिली ते सातवी अथवा पहिली ते आठवीच्या संयुक्तीकरीत्या पटसंख्या शंभरच्या वर असेल तर, मुख्याध्यापक पद द्यावे की देऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश नव्हते. इयत्ता सहावी ते आठवीला शंभर पटास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असेल तर, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांनाही शंभर पटाच्या वर मुख्याध्यापकपद मिळालेच पाहिजे, याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव नंदकुमार, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या वर्गांना ६० पर्यंत दोन व त्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार आहे, तसेच मुख्याध्यापकपद कमी करताना दहा टक्के पटाची सवलत दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत फार कमी होणार असून, उलट राज्यात सुमारे १५ ते २० हजार शिक्षक पदे निर्माण होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष पाटील, सरचिटणीस भोगेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)शासन निर्णयानुसार पहिलीते पाचवीच्या वर्गांना६० पर्यंत दोनत्यापुढील प्रत्येक ३० पटास एक शिक्षक व सहावी ते आठवीच्या वर्गांना ३५ ला एक शिक्षक मिळणार