शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

लोकसभेत प्रश्न मांडताना दिसले नाहीत, अमोल कोल्हे यांचा संजय मंडलिक यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:25 PM

'गॅस सिलिंडरकडे पाहून मतदानास जा'

कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडताना फारसे दिसले नाहीत, अशी टीका अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी रात्री शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे झालेल्या सभेत केली. वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेथे यांचे नाव आजही अभिमानाने घेतले जाते, पण स्वाभिमानाशी बेईमानी करणाऱ्यांना, तत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान दिले जात नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत कोल्हे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अजित खराडे होते.स्वाभिमानाचा, समतेचा विचार देणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तत्त्व, निष्ठा, मूल्य यांना किंमत राहिलेली नाही. या गाेष्टी बाजारात विकत घेऊ शकतो हेच अलिकडील राजकारणाने दाखवून दिले आहे. प्रधानमंत्र्यांच्या दबावानंतर ही सगळी मूल्ये पन्नास खोक्यांना विकली जाऊ लागली आहेत. म्हणूच लाचार होऊन सरपटत जाणाऱ्या गर्दीत सहभागी व्हायचे की ताठ मानेने स्वाभिमानी फौजेबरोबर जायचे हे दोनच मार्ग आपल्यासमोर आहेत, असे कोल्हे म्हणाले.प्रचार सभेतून आजकाल वैयक्तिक टीका केली जाऊ लागली आहे. जेव्हा वैयक्तिक टीका केली जाते तेव्हा समजायचे की समोरच्यांचा आत्मविश्वास ढळला आहे, असे सांगून कोल्हे म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली, महाराष्ट्रातील अनेक उद्योग बाहेर गेले. महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला गेला. परंतु महायुतीच्या राज्यातील ३९ खासदारांपैकी एकानेही लोकसभेत आवाज उठवला नाही. म्हणूनच तुम्हाला का निवडून द्यायचे असा प्रश्न त्यांना विचारण्याची वेळ आली आहे.यावेळी शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, विक्रम जरग, चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, दत्ता टिपुगडे, लालासो गायकवाड, संजय पवार यांची भाषणे झाली.गॅस सिलिंडरकडे पाहून मतदानास जाकेंद्र सरकारने तरुणांना हक्काचा रोजगार देण्याऐवजी त्यांना ऑनलाइन गेमिंग सुरू करून दिले. त्यामुळेच मतदानाला जाताना या बेरोजगारांचा चेहरा पाहून बाहेर पडा, गॅस सिलिंडरला तीन वेळा नमस्कार करून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेsanjay mandlikसंजय मंडलिक