हुंडा मुलाला नव्हे; आई-वडिलांना हवा असतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:10+5:302021-09-24T04:27:10+5:30

मुलीलाही लहानपणापासून पालकांनी जिवापाड जपलेले असते. तिच्या सगळ्या गरजा शिक्षण पूर्ण करण्यात त्यांचे आयुष्य जाते. तरी त्यांनी तिच्याकडून अर्थार्जनाची ...

Not the Hunda child; Parents want it | हुंडा मुलाला नव्हे; आई-वडिलांना हवा असतो

हुंडा मुलाला नव्हे; आई-वडिलांना हवा असतो

मुलीलाही लहानपणापासून पालकांनी जिवापाड जपलेले असते. तिच्या सगळ्या गरजा शिक्षण पूर्ण करण्यात त्यांचे आयुष्य जाते. तरी त्यांनी तिच्याकडून अर्थार्जनाची अपेक्षा ठेवलेली नसते. ते नि:स्वार्थी प्रेम असते. तुमच्या कुटुंबात मुलगी सून म्हणून येणार आहे, तरी लग्नाच्या वेळी रीत-पद्धत म्हणून हुंडा द्यावा लागणे, हे चुकीचे आहे.

-सौम्या कोगे (कोल्हापूर)

--

मुलीच्या पालकांना काय वाटते

हुंडा ही आता गरजेपेक्षा प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. मुलीला किती तोळे सोने घातले, लग्न किती धूमधडाक्यात केले याची चर्चा वर्षानुवर्षे रंगत असते. हे थांबवायचे असेल, तर जे मुले आणि कुटुंबीयांनी एक रुपयाही घेतलेला नाही, त्यांचा गावांनी सन्मान केला पाहिजे, तरच ही पद्धत बंद होईल.

-संजय भोसले (रुईकर कॉलनी)

--

हौस ही गोष्ट लग्नव्यवस्थेत सगळ्यात अडचणीची आहे. मुलीच्या माहेराने मुलाची हौसमौज करू नये का, आमच्या मुलाला सासरकडून काही मिळणार नाही, मुलगी आयुष्यभर सासरी नांदणार आहे, तिला दिले म्हणून काय झाले. पालकांचेही कर्तव्य आहे, या मानसिकतेने आजवर अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. आता समाजाने बदलले पाहिजे.

-शिवशाहीर राजू राऊत (शिवाजी पेठ, कोल्हापूर)

--

Web Title: Not the Hunda child; Parents want it