शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नहीं.. कुछ करोना - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

मी तिला अधून-मधून फोन करायचो. तिचाही मला फोन यायचा. मी तिच्या दुकानात जाताना, माझ्या ड्रेसवर परफ्युम मारून, व्यवस्थित ‘इन ...

मी तिला अधून-मधून फोन करायचो. तिचाही मला फोन यायचा. मी तिच्या दुकानात जाताना, माझ्या ड्रेसवर परफ्युम मारून, व्यवस्थित ‘इन शर्ट ’ करून जायचो.

एके दिवशी मी तिच्या दुकानातले, ' मेलोडी ' चॉकलेट विकत घेतले. मी ते चॉकलेट घेण्यासाठी ' हात ' पसरला. तेव्हा तिनं ते ' चॉकलेट ' माझ्या हातात देताना, तिनं तिच्या बोटानं माझ्या हाताला ' टच ' केला. मी लगेच तिचा तो नाजूक हात माझ्या हाताने हलकेच दाबला. “ मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी, असं म्हणतात ! ” अर्थात आम्ही ‘ मियाँ- बीबी’ होण्याची शक्यताही नव्हती, आणि तसा विचारही आमचा नव्हता. पण, तीच माझ्या स्वप्नातली, रश्के परी होती. मी आता स्वतःला ' थोरले बाजीराव ' आणि तिला ' मस्तानी ' समजू लागलो.

दहाव्या दिवशी मी तिला बाईकवर बसवून, कोल्हापूरच्या रंकाळ्यावर घेऊन गेलो. मी आजूबाजूचे पक्षी, माणसं, तलावातलं पाणी, झाडं, वेली पाहत काही क्षण घालवले.

तुमचं नाव काय? मी तिला विचारलं. ती म्हणाली, “ माझ्या नावाशी काय करायचंय तुम्हाला?, नावात काय आहे? असं शेक्सपिअर सांगून गेलाय ! तुम्हाला माहितच असेल ते ! " तिच्या त्या उत्तरानं मी गोंधळलो. उत्तर सरळ द्यायचं नसतं ! हा मुलींचा गुणधर्म असा.

थोड्या वेळानंतर मी तिला विचारलं, “ काही खाणार का? ” ती म्हणाली, “ तुमच्या पॉकेटमधल्या ‘ मनीचा ’ अंदाज घेऊन, ऑर्डर करा. ‘‘बरं कळलं.” मी म्हणालो.

“ भेळ की वडा ? ” मी विचारलं.

‘‘सर्व चालतं मला . मी ॲडजेस्ट करून घेईन ! ”

तिचं ते उत्तर ऐकून माझ्या मेंदूचा वडा झाला ! तिच्या स्वभावातला तो उद्धटपणा मला जाणवला.

मी दोघांसाठी भेळ घेऊन गेलो. त्यानंतर मी तिला काही आजारांविषयी आणि औषधांविषयी प्रश्न विचारले. मी तिला विचारले,‘‘ तुम्ही डी. फार्म आहात का?’’ ती हो म्हणाली. ‘‘तुम्ही कोणत्याही आजारावर औषध देता काय ?’’ ती म्हणाली, “ कोणाला, डायबिटिज झालेला असेल, अथवा बी. पी. असेल तर, त्यांना माझ्या मनाने औषध देत नाही.’’

ते ऐकून मी म्हणालो, “ मॅडम, माझ्या डाव्या गालाच्या खाली, थोडी सूज आहे, तसंच थोडं दुखतंय सुद्धा.’’ ती म्हणाली, “ बघू कुठं सुजलंय ते ? तिनं, माझ्या गालाजवळ येऊन, माझ्या गालाची ‘हात ’ लावून व्यवस्थित तपासणी केल्यानंतर, ती म्हणाली, “ तुम्हाला गालगुंड झालंय ! तुमची ‘ हिट’ ही वाढलेय !, तुम्ही असं करा, उद्या दुकानात या, मी औषधे देते.’’

मी तिला म्हणालो, ‘‘ आजपासून, तुम्ही आमचे फॅमिली डाॅक्टर !’’

दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर मला तिने औषध दिले. तिने दिलेल्या या औषधाचा माझ्यावर चांगलाच साईड इफेक्ट झाला.

माझं हे प्रेम ' लव्ह हन फिफ्टिज् ' वयातलं असलं तरी, प्रेमामध्ये वयाची कोणतीही डेडलाईन वगैरे असत नाही.

माझ्या सुदैवानं तिच्या मेडिकल दुकानात, अजूनही सीसीटीव्ही बसवलेला नाही. त्याचप्रमाणे मी ‘मास्क’ घालूनच तिच्या दुकानात जात असल्यामुळे, मला काेणी ओळखू शकत नव्हतं.