शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेने ‘उत्तर काशी’चे झाले टेंभू!

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

पाणी आलं, जमिनी गेल्या : गोपाळ गणेश आगरकरांच्या गावाला मिळाली नवी ओळख--नावामागची कहाणी-दोन

शंकर पोळ - कोपर्डे हवेली  -टेंभू गावाची ओळख वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत गेली. पूर्वी टेंभूला ‘उत्तर काशी’ म्हणून ओळखले जायचे. गोपाळ गणेश आगरकरांचे गाव म्हणून तर सध्या टेंभू योजनेचे गाव म्हणून राज्यात परिचित आहे.पूर्वेकडे डोंगर तर पश्चिमेकडे कृष्णा नदी़ मधोमध निसर्गरम्य ठिकाणी वसलेले टेंभू गाव. ऐतिहासिक, पौराणिक, स्वातंत्र्याचा इतिहास असणाऱ्या या गावात आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचा बोगदा खणून जिरायती क्षेत्र बागायतीत आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला़ हजारो हेक्टर जिरायती शेती बागायती झाली; पण त्याची झळ गावातील शेतकऱ्यांना पोहोचली. प्राचीन काळातील सर्व देवदेवतांची मंदिरे गावात आहेत़ मंदिरांची संख्या १२ ते १३ आहे़ काही मंदिरांचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे़ तर काही मंदिरे मोडकळीस आली आहेत़ पूर्वी या गावात शेतकरी हळदीचे पीक घेत होते़ ब्रिटिश काळामध्ये गावाच्या उत्तर दिशेने कृष्णा कॅनॉल गेल्याने त्याचा लाभ शेजारील शेतजमिनीला झाला. त्यामुळे काही शेती बागायती झाली़ स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटिशांवर चौफेर टीका केली़ आगरकरांबरोबरच या गावातील मारूती जगताप, भानुदास कदम, कृष्णत भुसारी, दत्तात्रय कुंभार, खाशाबा मदने आदींचाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर गावातील समाज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाला़ आगरकरांचे वंशज पुण्यात स्थायिक झाले़ गावाने आगरकरांची आठवण ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने दिवंगत गोपाळ गणेश आगरकर विद्यालय सुरू केले आहे़ विद्यालयाच्या प्रांगणात आगरकरांचा पुतळा आहे़ टेंभू योजनेचा फायदा झाल्याने गाव १०० टक्के बागायती झाले आहे. टेंभू गावची सध्याची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे़ एकूण ११ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडून जातात़ ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमी अटीतटीची होत असते़ सत्ताधारी ६ सदस्य तर विरोधी ५ सदस्य आहेत़दारूबंदीसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करूनही गावात दारूबंदी झाली नाही़ ग्रामपंचायतीने ‘निर्मलग्राम’चा पुरस्कार सलग तीनवेळा प्राप्त केला आहे. ...तरीही गावाला तोटाचटेंभू योजनेचा लाभ शेतीसाठी झाला असला तरी गावाला तोटाही मोठ्या प्रमाणात झाला आहे़ शेतकऱ्यांची ३०० ते ४०० एकर जमीन योजनेत गेली असल्याने शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने ज्यांची जमीन गेली, त्यांना शासकीय नोकरीत घेऊ, असे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही़ प्रकल्पग्रस्तांचे दाखले काहींना मिळाले तर काहींना मिळाले नाहीत़ १९९५ सालापासून शेतकऱ्यांना शासनाने झुलवत ठेवले आहे़टेंभू योजनेच्या पाण्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले. या योजनेचे पाणी गावात आले आणि उत्तर काशी म्हणून ओळखले जाणारे गाव आता ‘टेंभू’ या नावाने सर्वत्र परिचित झाले आहे. - प्रताप सावंत, उपसरपंच, टेंभू