शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अशासकीय मंडळाने घेतला ताबा

By admin | Updated: November 13, 2014 00:41 IST

शेती उत्पन्न बाजार समिती : विभागांचा घेतला आढावा; उपनिबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा ताबा अशासकीय मंडळाने आज, बुधवारी पुन्हा घेतला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सर्व १९ सदस्यांनी एकत्र बैठक घेतली. बाजार समितीच्या सभागृहातील बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यामुळे ‘प्रशासक’ म्हणून नियुक्त केलेले डॉ. महेश कदम यांनी पाहत असलेला कारभार रीतसर की, अशाकीय मंडळ चालवीत असलेले कामकाज रीतसर, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे बाजार समितीच्या अधिकारी, कर्मचारी यांना आपला ‘साहेब’ कोण हे कळत नसल्यामुळे प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचे निर्णय घेण्याला मर्यादा आल्या आहेत.पणन संचालकांनी बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांना हटवून सुरुवातीला अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. १५ जणांच्या अशासकीय मंडळाची संख्या १९ पर्यंत पोहोचली. याविरोधात तक्रार झाल्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय मंडळाच्या केलेल्या नेमणुकीस पणनचे संचालक डॉ. सुभाष माने यांनी अंतरिम स्थगिती शुक्रवारी (दि. ७) दिली. अंतरिम स्थगिती आदेशाच्या विरुद्ध माजी चेअरमन आर. के.पोवार, व्हाईस चेअरमन प्रा. निवास पाटील, सदस्य एम. पी. पाटील, सत्यजित जाधव, आदी अशासकीय मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पणनच्या संचालकांच्या आदेशाला स्थगिती दिली. यामुळे बाजार समितीच्या कारभाराबद्दल पेच निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय म्हणते, आम्हाला रीतसर अजून न्यायालयाचे आदेश आलेले नाहीत. यामुळे बाजार समितीवरील प्रशासक कायम आहे. अशासकीय मंडळ म्हणते, उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिल्यामुळे बाजार समितीचा कामकाज पाहण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे सध्या बाजार समितीचा कारभार अशासकीय मंडळाकडे की, प्रशासकांकडे, असा गुंता निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधकही यामध्ये ठोस अशी आपली भूमिका अध्याप स्पष्ट करीत नसल्याचे चित्र आहे. अशासकीय मंडळातील प्रा. निवास पाटील यांनी स्थगितीचा आदेश झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांना मोबाईलवरून माहिती दिल्याचे सांगतात, तर जिल्हा उपनिबंधक मला अजूनही रीतसर आदेशाचे पत्र मिळाले नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगत आहेत.(प्रतिनिधी) पणन संचालकांनी दिलेल्या आदेशाची माहिती उपनिबंधक शिरापूरकर यांना दिले आहेत. त्यांना आदेशाची प्रत हवी असल्यास इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकते. आम्ही प्रत नेऊन देणार नाही. उच्च न्यायालयानेच स्थगिती दिल्यामुळे बाजार समितीमध्ये कामकाज करण्याचा मार्ग खुला झाला. म्हणून आज अशासकीय मंडळातील १९ जण येऊन बैठक घेतली. कामकाज पाहिले. आम्हाला कोणीही अडविले नाही. प्रशासक फिरकलेही नाहीत. - प्रा. निवास पाटील, माजी व्हाईस चेअरमन, बाजार समितीउच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत मला मिळालेली नाही. त्यामुळे अद्याप पुढील कार्यवाही केलेली नाही. बाजार समितीच्या कामकाजाची सूत्रे प्रशासक डॉ. महेश कदम यांच्याकडेच आहेत. अशासकीय मंडळाकडे दिलेली नाहीत. - सुनील शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक