जनता कर्फ्यूपेक्षा ‘वीकेंड’मध्ये ध्वनीपातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:58+5:302021-04-13T04:23:58+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने वीकेंड लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर शहरातील ध्वनीपातळीचे मापन केले. त्यामध्ये गतवर्षीच्या जनता कर्फ्यूच्या तुलनेत ...

The noise level increased during the 'weekend' rather than the public curfew | जनता कर्फ्यूपेक्षा ‘वीकेंड’मध्ये ध्वनीपातळी वाढली

जनता कर्फ्यूपेक्षा ‘वीकेंड’मध्ये ध्वनीपातळी वाढली

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने वीकेंड लॉकडाऊनच्या काळात कोल्हापूर शहरातील ध्वनीपातळीचे मापन केले. त्यामध्ये गतवर्षीच्या जनता कर्फ्यूच्या तुलनेत यंदाची ध्वनीपातळी अधिक असल्याचे निरीक्षण समोर आले. मात्र, निर्धारित आदर्श पातळीपेक्षा ही पातळी कमी होती.

शहरातील महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी पर्यावरणाशास्त्र विभागाने पहिल्या वीकेंड लॉकडाऊन दरम्यान शनिवारी (दि. १०) ध्वनी पातळीचे मोजमाप केले. हे मोजमाप रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शांतता क्षेत्रातील आहेत. गेल्यावर्षी २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यूवेळी घेण्यात आलेल्या ध्वनी पातळीशी तुलना केल्यास या वीकेंड लॉकडाऊनमध्ये ध्वनीपातळी वाढल्याचे जाणवले. वीकेंड लॉकडाऊनमध्ये सरकारने काही क्षेत्राला दिलेल्या परवानगीने ध्वनीची पातळी जनता कर्फ्यूमधील ध्वनी पातळीपेक्षा अधिक असल्याचे जाणवले आहे, अशी माहिती पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी सोमवारी दिली. दरम्यान, डॉ. जाधव, सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. डी. राऊत, पी. आर. भोसले, एन. बी. पोखर्णीकर, संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, एम. एस्सी.चे विद्यार्थी योगेश गलगले, राहुल पाटील, अक्षय पाटील, महेश चव्हाण यांनी ध्वनी पातळीचे मोजमाप केले.

क्षेत्रनिहाय ध्वनीपातळी (डेसिबलमध्ये)

क्षेत्र जनता कर्फ्यू वीकेंड लॉकडाऊन

शांतता

सीपीआर ४८.४२ ५३.२३

न्यायालय ३९.४७ ४८.८२

जिल्हाधिकारी कार्यालय ३६.६१ ४७.७३

शिवाजी विद्यापीठ ३६.१४ ३९.६७

रहिवासी

राजारामपुरी ४६.६१ ५०.०५

शिवाजी पेठ ४३.८९ ५२.३६

उत्तरेश्वर पेठ ४३.५४ ५३.३८

मंगळवार पेठ ५०.५० ५२.५३

ताराबाई पार्क ३९.९१ ४८.९५

नागाळा पार्क ३९.४७ ४६.०५

व्यावसायिक

राजारामपुरी ४७.०४ ५६.३३

शाहुपुरी ४२.६३ ५३.८९

लक्ष्मीपुरी ४५.५९ ५३.६३

मिरजकर तिकटी ४५.२५ ५९.५८

बिनखांबी गणेश मंदिर ४४.८० ५८.३०

महाद्वार रोड ४४.५९ ५२.६३

गुजरी कॉर्नर ४१.१८ ५४.५१

पापाची तिकटी ४२.४० ५५.९८

गंगावेश ४३.३६ ५६.९१

बिंदू चौक ४२.०३ ५५.४९

औद्योगिक

वाय. पी. पोवारनगर ३५.१० ५१.४७

शिवाजी उद्यमनगर ३५.६१ ५६.७१

ध्वनी पातळीची मर्यादा

क्षेत्र मर्यादा (दिवसा)

औद्योगिक ७५

व्यावसायिक ६५

रहिवासी ५५

शांतता ५०

फोटो (१२०४२०२१-कोल-ध्वनी मोजमाप ०१, ०२) : कोल्हापूर शहरात वीकेंड लॉकडाऊनमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ध्वनी पातळीचे मोजमाप केले.

===Photopath===

120421\12kol_9_12042021_5.jpg~120421\12kol_10_12042021_5.jpg

===Caption===

फोटो (१२०४२०२१-कोल-ध्वनी मोजमाप ०१, ०२) : कोल्हापूर शहरात विकेंड लॉकडाऊनमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ध्वनी पातळीचे मोजमाप केले.~फोटो (१२०४२०२१-कोल-ध्वनी मोजमाप ०१, ०२) : कोल्हापूर शहरात विकेंड लॉकडाऊनमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ध्वनी पातळीचे मोजमाप केले.

Web Title: The noise level increased during the 'weekend' rather than the public curfew