शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ना आरटीपीसीआर, ना रॅपिड ॲंटिजेनची टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकावर रोज चार विशेष रेल्वेची ये-जा सुरू आहे. त्यातून दिवसभरात किमान ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्थानकावर रोज चार विशेष रेल्वेची ये-जा सुरू आहे. त्यातून दिवसभरात किमान पाच हजार प्रवाशांचीही ये-जा होते. मात्र, या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर कोणत्याही प्रकारची आरटीपीसीआर अथवा रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केली जात नाही. त्यामुळे कोरोना वाहकांची संख्या वाढण्याचा धोका वाढला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने तीन महिने लाॅकडाऊन जाहीर केला. त्यात २४ मार्च २०२० ला कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वेस्थानकातून सुटणाऱ्या १६ रेल्वे बंद केल्या. त्यामध्ये परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्या लक्षात घेता रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. त्यातून हजारो प्रवाशांनी उत्तरप्रदेश, गया, धनबाद, बिहार आदी ठिकाणी प्रवास केला. लाॅकडाऊननंतर काही प्रमाणात पूर्वपदावर आलेल्या परिस्थितीनंतर कोयना, महाराष्ट्र , तिरुपती, महालक्ष्मी आणि धनबाद एक्सप्रेस या पाचच विशेष रेल्वे नाव बदलून सुरू केल्या. त्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरू होत्या. कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर या पाचही रेल्वेमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात रोडावली. किमान या रेल्वेतून पाच हजारांहून अधिक प्रवासी कोल्हापूरात ये-जा करू लागले आहेत. विशेष म्हणजे या प्रवाशांची कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकात आल्यानंतर बाहेर जाताना आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केली जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार व फोनद्वारे मागणी केली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा व महापालिका प्रशासनाने अद्यापही त्यांचा मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

कोट

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची ॲंटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यासंदर्भात जिल्हा व महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही.

- ए. आय. फर्नांडिस , स्टेशन प्रबंधक, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स, कोल्हापूर