सकाळी ७ ते ११ वेळेत कारवाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:06+5:302021-04-30T04:31:06+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा ...

No action from 7 to 11 in the morning | सकाळी ७ ते ११ वेळेत कारवाई नको

सकाळी ७ ते ११ वेळेत कारवाई नको

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली असतानाही पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी वरील वेळेत ही कारवाई करू नये, अशी मागणी कोल्हापूर नागरी कृती समितीचे रमेश मोरे व कार्यकर्त्यांनी केली आहे.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना बंधने आणि जिल्ह्यात राजकीय नेते गाडीतून कार्यकर्त्यांना घेऊन फिरताना कोणत्याही नेत्यावर कारवाई झालेली दिसत नाही. पोलीस प्रशासनाने मागील दोन-तीन दिवसात वयोवृद्धांवरही गुन्हे दाखल केले आहेत. तरी सकाळी ७ ते ११ या वेळेमध्ये सामान्य नागरिकांवर कारवाई होऊ नये, अशी मागणी अशोक पोवार, विष्णू जोशीलकर, भाऊ घोडके, राजवर्धन यादव, कादर मलबारी, ॲड. रणजित गावडे, दादा लाड, चंद्रकांत पाटील, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, महेश जाधव यांनी केली आहे.

--

Web Title: No action from 7 to 11 in the morning