शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची २८ दिवसात अडीच कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 10:18 IST

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार रुपयांचा घरफाळा तर ९६ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली. या योजनेद्वारे घरफाळ्यात सवलत दिलेल्या २६ लाख ८६ हजार ६४२ रुपयांच्या विलंब आकारापैकी ११ लाख २९ हजार ७९७ इतक्या विलंब आकाराची सूट देण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेची २८ दिवसात अडीच कोटींची वसुलीवसुली मोहिमेला प्रतिसाद

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार रुपयांचा घरफाळा तर ९६ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली. या योजनेद्वारे घरफाळ्यात सवलत दिलेल्या २६ लाख ८६ हजार ६४२ रुपयांच्या विलंब आकारापैकी ११ लाख २९ हजार ७९७ इतक्या विलंब आकाराची सूट देण्यात आली.

दि. १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७ कोटी ३४ लाख ४४ हजार ५२४ इतकी पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार वसूल झाला आहे.
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंअंतर्गत गुरुवारी प्रमिलाराजे रुग्णालयाकडून ७८ लाख ५३ हजार ४६१, बटालियन (आर्मी) विभागाकडून सहा लाख तीन हजार ८७२ व इतर थकबाकीदारांकडून अशी एकूण ९६ लाख ७४ हजार ४८७ इतकी थकबाकी वसूल करण्यात आली. मागील आठ दिवसांमध्ये थकबाकी न भरलेल्यांची एकूण १९ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा विभागाच्या वसुली पथकामार्फत १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७५ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून तीन कोटी ८५ लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

वसुलीची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे असून वसुली पथकप्रमुख मोहन जाधव, शांताराम पोवार, पी. एस.माने, अमर बागल, संजय पाटील तसेच सर्व मीटर रिडर्स व फिटर यांनी भाग घेतला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर