शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीतील पशुवैद्यकीय दवाखाना ओसाड

By admin | Updated: November 28, 2014 00:14 IST

खासगी डॉक्टरांचा आधार : सोईचा अभाव, दवाखाना औरवाडला हलविण्याची मागणी

बुबनाळ : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना औरवाड व गौरवाड गावासाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनला आहे. त्यामुळे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी उमटत असून, होणाऱ्या गैरसोयीमुळे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना औरवाड येथे हलविण्याची मागणी होत आहे.नृसिंहवाडी येथे या गावासह औरवाड, गौरवाड या तीन गावांसाठी जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याला गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारीच नव्हता, तर १० वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीला शिपाईही नाही, अशी अवस्था या दवाखान्याची असताना आॅगस्ट २०१४ पासून या दवाखान्यास वैद्यकीय अधिकारी मिळाला; पण लसीकरणाच्या अथवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना दवाखाना उघडायला वेळ नाही, अशा अवस्थेत हा दवाखाना सापडला आहे.दरम्यान, या दोन गावांतील परिसरात दुधाळ जनावरांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे. शेतीस जोडधंदा म्हणून या भागातील शेतकरी दोन-तीन जनावरे बाळगतो. सध्या दुधास चांगला दर मिळत असल्याने घर खर्च चालूून चार पैसे शिल्लक राहत असल्याने दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा बनला आहे. शेतकरी आपल्यापेक्षा जनावरांना जिवापाड जपत आहेत; पण त्यांच्या आजारपणात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविना जनावरे कित्येकदा मृत्यूच्या दारात बांधावी लागत आहेत. नृसिंहवाडी शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना पूर्वी ग्रामपंचायतीच्या जागेवर उभा होता. नंतरच्या काळात दवाखाना भाड्याच्या जागेत हलविण्यात आला. या ठिकाणी जनावरे तपासणीसाठी खोडा नाही. जनावरे बांधण्यासाठी बाहेर जागा नसल्यामुळे या दवाखान्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. बहुतांशवेळा शेतकरी डॉक्टरांनाच आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे नेऊ लागले आहेत. दवाखान्यात पाण्याचा, विजेच्या सोयीचा अभाव आहे. याबाबत नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडे दुसऱ्या जागेची मागणी वेळोवेळी करूनही या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे योग्य उपचाराअभावी अनेक जनावरे वांझ पडत आहेत. शासनाच्या लाभदायी योजनांपासून दूध उत्पादक शेतकरी वंचित राहत आहे. पर्यायी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असल्याने औरवाड येथे हा दवाखाना हलविण्याची मागणी परिसरातून होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसानजिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना देण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन लसीची किंमत २२ रुपये आहे. मात्र, खासगी डॉक्टरांकडून ती शंभर रुपये आकारली जाते. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.