तीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळ, पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:58 IST2021-06-11T16:50:23+5:302021-06-11T16:58:29+5:30

Crimenews Kolhapur : माहेरहून ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तगादा लावून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अमित श्रीपती खानविलकर व नणंद सुप्रिया अश्विन आयरे दोघेही (रा. गिजवणे ता.गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Newlyweds harassed for Rs 3 lakh, case filed against husband and niece | तीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळ, पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

तीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळ, पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देतीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळगिजवणे येथील घटना : पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

गडहिंग्लज : माहेरहून ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तगादा लावून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अमित श्रीपती खानविलकर व नणंद सुप्रिया अश्विन आयरे दोघेही (रा. गिजवणे ता.गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियांका अमित खानविलकर या पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी,१२ जून २०२०रोजी प्रियांका आणि अमित यांचा विवाह झाला आहे. विवाहानंतर प्रियांका ही गिजवणे येथील मधल्या गल्लीत रेणुका मंदीरानजीकच्या सासरच्या घरी राहते.

दरम्यान,विवाहानंतर तीन महिन्यातच पती अमित आणि नणंद सुप्रिया हे दोघे मिळून कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रियांकाला शारीरिक व मानसिक त्रास देवू लागले.पत्नी म्हणून तू शोभत नाहीस असे म्हणत त्यांनी तिला शिवीगाळ करून मारहाणही केली.

आपल्या कामधंद्यासाठी तिने आई-वडीलांकडून ३ लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावला. पैसे घेवून आल्याशिवाय तू नांदायला येवू नकोस अशी धमकीही त्यांनी तिला दिली. पिडीत प्रियांका खानविलकर हिच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडक्वॉन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Newlyweds harassed for Rs 3 lakh, case filed against husband and niece